एक्स्प्लोर
LG च्या आयपीओवर पैशांचा पाऊस, IPO साठी विक्रमी बोली, बजाज हाऊसिंग फायनान्सचा विक्रम मोडला
LG IPO : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आयपीओसाठी 4.39 लाख कोटी रुपयांची बोली लागली आहे. आयपीओ 54 पट सबस्क्राइब करण्यात आला आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओ
1/6

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आयपीओनं मोठा विक्रम केला आहे, हा विक्रम मोडणं दुसऱ्या कंपनीला सोपं असणार नाही. एलजीचा आयपीओ 11607 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला गेला आहे. या आयपीओसाठी 4.39 लाख कोटी रुपयांची बोली लागली आहे. एखाद्या आयपीओसाठी एवढ्या मोठ्या रकमेची बोली लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओवर 3.2 लाख कोटींची बोली लागली होती.
2/6

एलजीच्या अनलिस्टेड शेअरचा जीएमपी 345-350 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एलजीचा आयपीओ लिस्ट होत असताना कंपनीचा शेअर 1490 रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. एलजीचा आयपीओ 54 पट सबस्क्राइब झाला आहे. क्यूआयबी म्हणजेच पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 166 पट आयपीओ सबस्क्राइब झाला आहे. हाय नेटवर्थ इंडिविजुअल्सनं 22 पट बोली लावली. रिटेल गुंतवणूकदारांनी 3.54 पट आयपीओ सबस्क्राइब केली.
3/6

एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर पर्यंत बोली लावण्यासाठी खुला होता. कंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 1080 रुपये ते 1140 रुपये ठेवला होता. इशू प्राईसच्या कमाल हिशोबानं कंपनीचं बाजारमूल्य 77400 कोटी रुपये आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल होता. प्रमोटर्स या आयपीओच्या माध्यमातून त्यांच्याकडील शेअरची विक्री करणार आहेत.
4/6

आज आयपीओ सबस्क्राईब करण्याची मुदत संपली आहे. 10 ऑक्टोबरला शेअर अलॉट होण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबरला ज्यांना आयपीओ अलॉट झाला नाही त्यांना पैसे रिफंड केले जातील. 14 ऑक्टोबरला शेअर लिस्ट होणार आहेत.
5/6

एलजी इलेक्ट्रॉनिक्स घरगुती उपकरण आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारात अग्रेसर कंपनी मानली जाते. कंपनी वॉशिंग मशीन,फ्रीज, एलईडी टीव्ही, इन्वर्टर, एसी आणि मायक्रोवेव सारख्या उपकरणांची निर्मिती करते. कंपनीचे प्लॉट नोएडा आणि पुण्यात आहेत.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 09 Oct 2025 09:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























