एक्स्प्लोर
'हा' म्युच्यूअल अल फंड चांगलाच भारी, 8 दिवसांत 9 टक्क्यांनी रिटर्न्स!
सध्या म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे अनेक म्युच्यूअल फंड आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कमी काळात जबरदस्त रिटर्न्स दिलेले आहेत.

mutual fund (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

Motilal Oswal Defence MF: जुलै महिन्यात एक नवा म्युच्यूअल फंड लॉन्च झाला आहे. या म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या काही दिवसांतच चांगला परतावा मिळाला आहे.
2/8

या फंडाला लॉन्च होऊन फक्त आठ दिवस झाले आहेत. या फंडात गुंतवणूक करणारे साधारण 9 टक्क्यांनी फायद्यात आहेत.
3/8

या फंडाचे नाव मोतालाल ओस्वाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड असे आहे. हा एक पॅसिव्ह म्युच्यूअल फंड आहे. संरक्षण क्षेत्रावर आधारित हा फंड आहे. लॉन्च झाल्यानंतर अवघ्या आठ दिवासंत या फंडाने गुंतवणूकादारांना 8.62 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
4/8

मोतीलाल ओस्वालच्या या डिफेन्स म्युच्यूअल फंडाची न्यू फंड ऑफर गेल्या महिन्यात लॉन्च झाली होती. या फंडाचा एनएफओ 13 जून रोजी खुला झाला होता. तर सबस्क्रिप्शनसाठी हा फंड 24 जूनपर्यंत खुला होता.
5/8

मोतीलाल ओस्वाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंडाने एनएफओच्या माध्यमातून 1,676 कोटी रुपये गोळा केले.
6/8

या फंडाच्या पोर्टफोलिओचा विचार करायचा झाल्यास या फंडाची 21.9 टक्के होल्डिंग हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये आह. त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये या फंडाची 20.5 टक्के होल्डिंग आहे. भारत डायनेमिक्समध्ये 9.2 टक्के आणि कोचिन शिपयार्डमध्ये या फंडाची 9 टक्के होल्डिंग आहे.
7/8

या फंडाच्या होल्डिंगमध्ये माझगांव डॉक शिपबिल्डर्स (6.4%), प्रीमियर एक्सप्लोझिव्स (8.09%), एस्ट्रा माइक्रोवेव प्रॉड (4.7%), डेटा पॅटर्न (4.4%), गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स (2.7%), बीईएमएल (5.95%), सोलर इंडस्ट्रीज (13.7%), सायंट डीएलएम (5.57%) आणि एमटीएआर टेक्नोलॉजीज (2.3%) यांचाही समावेश आहे.
8/8

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 14 Jul 2024 01:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
