एक्स्प्लोर
HDFC AMC : एचडीएफसी एएमसीचा नफा 18 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, लाभांश देणार, प्रति शेअर 'इतके' रुपये खात्यात येणार
HDFC AMC : एचडीएफसी एएमसीचा नफा 18 टक्क्यांनी वाढला आहे. बँकेनं शेअरधारकांना दिलासा देत लाभांश वाटप जाहीर करणार असल्याची घोषणा केली.
एचडीएफसी एएमसी
1/6

एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत 18 टक्क्यांनी वाढून 638 कोटी रुपये झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 541 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या महसुलात देखील मोठी वाढ झाली आहे.
2/6

आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 901 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वीच्या म्हणजे 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 695 कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीचं इतर उत्पन्न चौथ्या तिमाहीत 21 टक्क्यांनी घटून 123 कोटी रुपये झालं आहे.
Published at : 17 Apr 2025 05:03 PM (IST)
आणखी पाहा























