एक्स्प्लोर
Card Payment : क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंटचे बदलणार नियम; जाणून घ्या
RBI Tokenization Rule : ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे.
Card Payment : क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंटचे बदलणार नियम; जाणून घ्या
1/10

देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे.
2/10

1 ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे.
3/10

या पूर्वी हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता, पण RBI ने ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून 30 जून केली होती. नंतर आरबीआयने आपली अंतिम मुदत पुन्हा 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवली.
4/10

आरबीआयने सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा ऑनलाइन, पॉइंट-ऑफ-सेल आणि अॅप-मधील व्यवहार एकामध्ये एकत्र करून एक टोकन जारी करणार असल्याचे सांगितले आहे.
5/10

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी नमूद करावा लागतो. जेव्हा ही सर्व माहिती योग्यरित्या भरली जाते तेव्हाच व्यवहार यशस्वी होतो.
6/10

टोकनायझेशन कार्ड तपशील "टोकन" नावाच्या पर्यायी कोडमध्ये रूपांतरित करेल. हे टोकन कार्ड, टोकन विनंतीसाठी आणि डिव्हाइसवर अवलंबून असेल.
7/10

जेव्हा कार्ड तपशील एन्क्रिप्टेड पद्धतीने संग्रहित केले जातात तेव्हा फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
8/10

जेव्हा तुम्ही तुमचे डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती टोकन स्वरूपात शेअर करता तेव्हा तुमचा धोका कमी होतो.
9/10

रिझव्र्ह बँकेने टोकन प्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यवहारासाठी कार्ड तपशील इनपूट करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
10/10

टोकनायझेशनमध्ये तुमच्या कार्डची माहिती एका पर्यायी कोडमध्ये रूपांतरित केली जाईल. या कोडच्या मदतीने पेमेंट करणे शक्य होईल.या प्रक्रियेत तुम्हाला तुमच्या कार्डचा CVV नंबर आणि वन टाईम पासवर्ड देखील आवश्यक असेल. याशिवाय अतिरिक्त पडताळणीसाठीही संमती द्यावी लागेल.
Published at : 19 Sep 2022 10:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सोलापूर
नांदेड
महाराष्ट्र
























