या पक्षाला दुष्काळाची देखील चाहूल लागते. त्यामुळे आपल्या पिल्लांचे हाल होऊ नयेत म्हणून मादी अंडी घरट्यामधून जमिनीवर पाडते असा देखील एक समज शेतकऱ्यांमध्ये प्रचलित असल्याचं काही ठिकाणी दिसून येते. (PHOTO : नितीन नार्वेकर, चिपळूण, रत्नागिरी)
2/10
घरटं बांधल्यानंतर पिल्लांच्या सुरक्षेची देखील यावेळी पूर्णपणे काळजी घेतलेली असते. मुळात साप, सरडा या शत्रुंपासून संरक्षण करण्यासाठी फांदीच्या टोकाला सुरक्षितपणे उंच ठिकाणी बांधलेल्या पुंगीच्या आकाराच्या घरट्यामध्ये दोन चेंबर्समध्ये हे घरटं बांधलं जातं. सर्वात वरच्या चेंबर्समध्ये मादी अंडी देते. शत्रुपासून रक्षण करणे हाच यामागील उद्देश! (PHOTO : नितीन नार्वेकर, चिपळूण, रत्नागिरी)
3/10
नर एक घरटं बांधून पूर्ण झाल्यानंतर दुसरं घरटं बांधायला घेतो. त्यानंतर दुसरी मादी त्याच्याकडे आकर्षित होते. अशारितीनं एक नर साधारण तीन ते चार मादींशी मिलन करतो. हा पक्षी सामुदायिक पद्धतीनं वास्तव्य करतो. (PHOTO : नितीन नार्वेकर, चिपळूण, रत्नागिरी)
4/10
संघर्ष हा मनुष्यजातीच्या जीवनातील अविभाज्य भाग...पण, याला प्राणी किंवा पक्षी देखील अपवाद नाहीत. बरं का? संसार आणि किमान 'वन रूम किचन'साठीचा संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो. पण, पक्षांमध्ये देखील संसारासाठी किंवा जोडीदारासाठीचा हा संघर्ष दिसून येतो. (PHOTO : नितीन नार्वेकर, चिपळूण, रत्नागिरी)
5/10
जून ते ऑगस्ट हा पक्षाचा विणीचा हंगाम...घरटं बांधून झाल्यानंतर मादी 3 ते 6 अंडी देते. पुढील 15 दिवस ते 20 दिवसात या घरट्यामधून पिल्लं बाहेर येतात. महिनाभर या घरट्यात सुखानं संसार केल्यानंतर सुगरणीचं हे कुटुंब घरटं सोडून उडून जातात ते परत न येण्यासाठी. त्यानंतर पुढील वर्षी नवीन घरटी बांधली जातात (PHOTO : नितीन नार्वेकर, चिपळूण, रत्नागिरी)
6/10
सुरगणीचा हा संघर्ष मनुष्याला मनुष्याला आत्मविश्वास आणि जिद्द शिकवतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अरे खोप्यामधी खोपा, सुरगणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला, खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा अशा शब्दात बहिणाबाईंनी देखील याचं वर्णन केले आहे. (PHOTO : डॉ. आदित्य शिंदे, राजापूर, रत्नागिरी)
7/10
निसर्गचक्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला सुगरण हा पक्षी सध्या कमी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी देखील काही संस्था या पुढाकार घेत आहेत. सुरवंट किंवा किडे यांना खात असल्यानं हा पक्षी शेतकऱ्यांचा मित्र देखील आहे. (PHOTO : डॉ. आदित्य शिंदे, राजापूर, रत्नागिरी)
8/10
ऐकायला रंजक आणि उत्सुकता वाढवणारी ही गोष्ट असली तरी त्यामध्ये कठोर परिश्रम आहेत...साधारण 14 ते 20 दिवसांचा कालावधी एक घरटं बांधण्याकरता लागतो. काही घरटी आपल्याला अर्धवट अवस्थेमध्ये दिसून येतात. घरटं न आवडल्यास हे घरटं नराला पुन्हा बाधावं लागतं.त्यामुळे काही घरटी आपल्याला अर्धवट अवस्थेमध्ये देखील दिसून येतात असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. (PHOTO : डॉ. आदित्य शिंदे, राजापूर, रत्नागिरी)
9/10
विणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर नराचा रंग पिवळा होत जातो. गवताच्या काड्यांपासून घरटं बांधून झाल्यानंतर नर पंख फडफडवून मादीला आकर्षित करतो. त्यानंतर अर्धवट अवस्थेत असलेलं घरटं मादी पाहते आणि पसंत पडल्यास ते घरटं दोघंही बांधून पूर्ण करतात. त्यानंतर दोघांचं मिलन होते. (PHOTO : डॉ. आदित्य शिंदे, राजापूर, रत्नागिरी)
10/10
सुगरण ( baya weaver, polceus philippinus ) या पक्षांची, पक्षांंमधील कारागिर किंवा इंजिनिअर म्हणून ओळख आहे. भातशेती तयार किंवा काहीशी पिवळी झाल्यानंतर खैर, बाभूळ किंवा माडाच्या झाडांच्या फांदीच्या टोकावर वाऱ्यासंग झुलणारी घरटी मनमोहून टाकतात.घरटी लक्षवेधी असली तरी त्यामागील कहाणी किंवा संघर्ष नक्कीच प्रेरणादायी आहे. (PHOTO : डॉ. आदित्य शिंदे, राजापूर, रत्नागिरी)