एक्स्प्लोर
Astrology : तब्बल 500 वर्षांनंतर बनले 3 दुर्मिळ राजयोग; 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Triple Rajyog : सप्टेंबर महिन्यात एकत्र 3 राजयोगांची निर्मिती झाली आहे, ज्यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरू होतील. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.
Triple Rajyog after almost 500 years
1/10

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात, तेव्हा अनेक वेळा शुभ राजयोग तयार होतात, ज्याचा परिणाम सर्व जगावर होतो. यातच सप्टेंबर महिन्यात 3 राजयोग तयार होत आहेत, ज्यामुळे काही राशींचं नशीब पालटू शकतं.
2/10

शनीने शश राजयोग (Shash Rajyog) निर्माण केला आहे. शुक्राने तूळ राशीत प्रवेश करुन मालव्य राजयोग (Malavya Rajyog) निर्माण केला आहे. तर ग्रहांचा राजकुमार बुध 23 सप्टेंबरला स्वतःच्या कन्या राशीत प्रवेश करून भद्रा राजयोग (Bhadra Rajyog) तयार करेल. या राजयोगांमुळे कोणत्या राशींचं भाग्य उजळणार? जाणून घेऊया.
3/10

मेष रास (Aries) : बनत असलेले 3 राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो.
4/10

तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडूनही काही चांगली बातमी मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या वागण्यामुळे सर्वजण तुम्हाला मदत करतील. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते. तसेच, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
5/10

वृषभ रास (Taurus) : तीन राजयोगांची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. तुम्हाला स्थावर मालमत्तेतूनही फायदा होईल. ऑफिसमधील सहकारी तुम्हाला प्रत्येक बाबतीत मदत करतील.
6/10

या महिन्यात तुम्ही तुमच्या आर्थिक खर्चावर लक्ष ठेवाल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील. यावेळी आर्थिक सुरक्षितता असेल. तुम्ही मिळवलेल्या यशामुळे तुमची सर्वत्र प्रशंसा होईल.
7/10

कन्या रास (Virgo) : कन्या राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. याव्यतिरिक्त, प्रत्येक कार्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण मदत आणि सहकार्य मिळेल.
8/10

या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यावेळी नोकरदारांना कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते.
9/10

कुंभ रास (Aquarius) : कुंभ राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. या काळात तुमचे संबंध स्थिर राहतील.
10/10

तुमचा पार्टनर महिनाभर तुम्ही काय बोलता याकडे लक्ष देईल. महिनाभर तुमच्या तब्येतीची कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही यावेळी छान असेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरेल.
Published at : 21 Sep 2024 01:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















