एक्स्प्लोर
Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्येला चुकूनही खाऊ नका 'हे' पाच पदार्थ, अन्यथा मिळेल अनिष्ट फळ
Mauni Amavasya 2025 : अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून पाळल्या पाहिजे, अन्यथा व्यक्तीला वर्षभर त्रास सहन करावा लागतो. त्यानुसार, या दिवशी काही पदार्थ हिंदूधर्मशास्त्राने वर्ज्य सांगितले आहेत.
Do not eat these five foods on Amavasya
1/6

हिंदू कॅलेंडरनुसार, अमावस्या ही कृष्ण पक्षातील शेवटची तारीख असते, शेवटचा दिवस असतो, या दिवशी चंद्र दिसत नाही. अमावस्योला आकाशात अंधार असतो, या अंधाराचा प्रभाव माणसावर पडल्याने व्यक्ती नकारात्मक विचारांनी आणि अडचणींनी घेरली जाते.
2/6

अमावस्येच्या दिवशी काही कामं चुकूनही करू नये, अन्यथा तुम्हाला आयुष्यभर त्रास सहन करावा लागू शकतो. अमावस्येला काही गोष्टींचं सेवन देखील वर्जित आहे. यात प्रथम म्हणजे, मांस-मासे. अमावस्येला मांसाचं सेवन केल्यास त्या व्यक्तीसमोर संकटांचा डोंगर उभा राहतो.
3/6

अमावस्येला दारु पिऊ नये, असं करणाऱ्या व्यक्तीला त्याचे वाईट फळ भोगावे लागते. या व्यक्तींना संतती त्रास देखील होऊ शकतो.
4/6

अमावस्येच्या दिवशी सिगारेट, विडी देखील ओढू नये. असं करणाऱ्यांच्या घरात दारिद्र्य नांदू लागतं आणि धन-संपत्ती हळूहळू नष्ट होते.
5/6

अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेऊ नये, या दिवशी दुसऱ्यांच्या घरी जेवल्यास तुमची संचित पुण्य कर्म कमी होतात आणि घरावर गरिबी देखील येते.
6/6

तुम्ही कधीही चिकन, मटण, मासे खा. पण अमावस्येला चुकूनही या पदार्थांचं सेवन करू नका. असे केल्यास तुम्हाला वारंवार अडचणींचा सामना करावा लागेल, प्रत्येक कामात तुम्हाला फक्त अपयशच मिळेल.
Published at : 29 Jan 2025 09:18 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत























