एक्स्प्लोर
'या' जन्मतारखेचे लोक असतात खूप भाग्यवान, धैर्यवान; तुमचा मूलांक आहे का यात?
हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला खूप महत्त्व आहे. अंकशास्त्रही याचाच एक भाग आहे.
Numerology
1/9

अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व तसेच, त्याच्या जन्मतारखेच्या आधारे त्याच्या भविष्याविषयी माहिती देतं.
2/9

अंकशास्त्राद्वारे तज्ज्ञ व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित भविष्यातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल माहिती देतात.
3/9

अंकशास्त्रात, मूलांक आणि भाग्यांक व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे काढली जाते. राशींप्रमाणेच, प्रत्येक मूलांक देखील कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतो.
4/9

धार्मिक तज्ज्ञांच्या मते, काही तारखांना जन्मलेले लोक खूप भाग्यवान तसेच धैर्यवान असतात.
5/9

मूलांक-1 : कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. या मूलांकाच्या व्यक्तीमध्ये नेतृत्वगुण असतात. त्यांच्या याच गुणांमुळे ते कठीणातलं कठीण कामही सहज करू शकतात.
6/9

मूलांक-3 : कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 आहे, ज्यांचा स्वामी बुध आहे. मूलांक 3 असलेले लोक स्वाभिमानी असतात.
7/9

मूलांक-5 : 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. हे धाडसी स्वभावाचे लोक त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात.
8/9

मूलांक-9 : 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 9 असतो. या मूलांकाचे लोक साहसी, धाडसी आणि भावनिक असतात.
9/9

(टिप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून सांगत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 22 Oct 2024 06:46 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























