एक्स्प्लोर
Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला बनतोय 'हा' शुभ संयोग, शनिच्या साडेसातीपासून मिळणार आराम! जाणून घ्या
Mahashivratri 2023: महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा केली जाते. यामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
mahashivratri 2023 trigrahi yog astrology marathi news
1/9

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीची शिवभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे.
2/9

या दिवशी भक्त पूर्ण भक्तिभावाने शिवाची पूजा करतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवाने कैलास पर्वतावर माता पार्वतीशी विवाह केला होता.
3/9

यावेळी महाशिवरात्रीला एक दैवी आणि दुर्मिळ योगायोग घडत आहे. 18 फेब्रुवारीला शनि आणि सूर्याव्यतिरिक्त चंद्रही कुंभ राशीत असेल. कुंभ राशीमध्ये शनि, सूर्य आणि चंद्र एकत्र आल्यावर त्रिग्रही योग तयार होईल.
4/9

याशिवाय शनि प्रदोष व्रत हा देखील महाशिवरात्रीला शुभ संयोग बनत आहे. अशा स्थितीत तुमच्या राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असेल, तर तुम्ही या विशेष दिवशी काही उपाय करून आराम मिळू शकतो.
5/9

ज्या लोकांना शनि साडेसातीचा त्रास होत असेल, त्यांनी या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून भगवान शंकराचा जलाभिषेक करावा. यामुळे साडेसातीचे दुष्परिणाम कमी होतील.
6/9

ज्या लोकांना शनी ढैय्याचा त्रास होतो, अशा लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. जल अर्पण केल्यानंतर देवाचे स्मरण करून येथे पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
7/9

शनीच्या साडेसाती आणि ढैय्या सुरू असलेल्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस खास आहे. या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि हनुमानजींची पूजा करावी.
8/9

शनिदेवाच्या कृपेसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी दान करावे. यातून तुम्हाला विशेष फायदा होईल.
9/9

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणाचे पठण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करावा.
Published at : 17 Feb 2023 02:02 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
क्रिकेट
महाराष्ट्र




















