Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
आज इंदापूर आणि बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांच्या एकाच वेळी सभा, काका पुतणे इंदापुरात दुपारी 1 आणि बारामतीत दुपारी 2 वाजता सभा घेणार.
भंडाऱ्यातील साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा रोड शो, लाखांदूर, लाखनी आणि साकोली या तिन्ही तालुक्यात पटोलेंचा रोड शो, त्यानंतर साकोली येथे शेवटची प्रचार सभा घेणार.
शंभुराज देसाई आमदार असलेल्या पाटण मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा, पाटणमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष सत्यजित पाटणकर आणि ठाकरे गटाचे हर्षल कदम अशी तिरंगी लढत.
काँग्रेसमध्ये कुणीही विचारलं नाही म्हणून शंभूराज देसाई आपल्याकडे आले होते, गद्दारी झाली तेव्हा हाच लांडगा सर्वात पुढं होता, पाटणमधल्या सभेत उद्धव ठाकरेंची शंभुराज देसाईंवर टीका.
उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक टीका करणं योग्य नाही, ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, त्यांच्याकडे विकासकामांबाबत बोलण्यासारखं काही नसल्यानं ते टीका करतात, शंभुराज देसाईंचं प्रत्युत्तर.
उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीचा सिलसिला सुरुच, पालघरमध्ये विराज कंपनीच्या हेलिपॅडवर सभेआधी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी.
माझी बॅग तपासल्यावर केवळ नंतर नाटकं करण्यासाठी सगळ्यांच्या तपासल्या, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर मोदींची बॅग तपासली का, तपासली तरी थापाच मिळतील ठाकरेंची खोचक टीका.
All Shows

































