एक्स्प्लोर
Shani Gochar : 2025 मध्ये 'या' 2 राशींवर असणार शनीची साडेसाती; पावलोपावली राहावं लागेल सावध, होणार प्रचंड धनहानी
Shani Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानतात. शनी प्रत्येक व्यक्तील आपल्या कर्मानुसार फळ देतो. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्ष स्थित असतो.

Shani Gochar
1/8

कर्मफळदाता शनी 2025 मध्ये कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या या संक्रमणाने काही राशीच्या लोकांवर शनी ढैय्या सुरु होणार आहे.
2/8

ज्योतिष शास्त्रानुसार, शनी ढैय्याने पिडीत राशीच्या लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक कष्टायचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काळात पैशांच्या बाबतीत सावधानता बाळगा. तसेच, आरोग्याची काळजी घ्या.
3/8

ज्योतिष शास्त्रानुसार, शनीची ढैय्या अडीच वर्षांपर्यंत असते. या दरम्यान काही राशीच्या लोकांना शुभ-अशुभ परिणाम मिळतात. ज्यांच्यावर शनीची ढैय्या सुरु आहे अशा राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असतो.
4/8

शनी सध्या आपली स्वराशी म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. 29 मार्च 2025 मध्ये शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. शनीचं हे संक्रमण रात्री 11 वाजून 01 मिनिटांनी होणार आहे.
5/8

2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार असल्याने सिंह अणि धनु राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु आहे.
6/8

त्यामुळे पुढचे अडीच वर्ष या दोन राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्याचा सामना करावा लागू शकतो.
7/8

मकर राशीच्या लोकांना या काळात शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तर, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना ढैय्यापासून मुक्ती मिळेल.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 13 Nov 2024 10:09 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
सोलापूर
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
