एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार

Uddhav Thackeray BKC Speech : देवेंद्र फडणवीस धर्मयुद्ध म्हणतात, दंगली भडकतील अशी त्यांची भाषा आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. 

मुंबई : महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता जिंकणार हे ठरवणारी निवडणूक आहे. मुंबई केंद्रशासित करता येत नाही, तोडता येत नाही म्हणून मुंबई महापालिका विसर्जित केली आणि त्यांच्या मित्रांकडून मुंबई ओरबाडणं सुरू आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीच्या वतीने बीकेसीमध्ये सभा घेण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 

उद्धव ठाकरेंचे बीकेसीतील भाषण 

देवेंद्र फडणवीस मतांचं धर्मयुद्ध म्हणत आहेत. मग त्यांनी स्पष्ट केल पाहिजे कुणाला मतांचा अधिकार आहे ते. त्यानी स्पष्ट करावं मुसलमानाना मतदानाचा अधिकार नाही का? मोदी तुमचा चेला चपाटा राज्यात दंगली भडकतील अशी भाषा वापरत आहे. मी शपथ घेतोय शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र मोदी-अमित शाह, अदानींच्या हातात देणार नाही. 

महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता जिंकणार हे ठरवणारी निवडणूक आहे. मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, या सरकारला मुंबईचा जीडीपी वाढवायच आहे. आता नखे वाढतात, जटा वाढतात, जिडीपी कसा वाढवतात हे यांना माहिती नाही. नीती आयोगाने काही सूचना केल्या आहेत. 

देवेंद्र फडणवीस  तुम्ही मुंबईवर घाला घातला तर बटेंगे फटेंगे नहीं, आपको काटेंगे. त्यांना बटेंगेची भाषा वापरावी लागते. मोदी पंतप्रधान असताना हे व्हावं? मोदी यांनी राजीनामा द्यावा आपल्याला मी शिवसेना कसं काम करते हे दाखवतो. 

संविधान बदलणार हे आपण बोललो नाही. भाजपचे लोक बोलले. हरल्यावर म्हणाले फेक नरेटिव्ह करण्यात आला. आता मला सांगा अदानी हा विषय फेक नरेटिव्ह आहे का? याच उत्तर द्या. कोल्हापूरचं पाणी अदानी, चंद्रपूर येथील खान अदानी, वाढवण बंदर देखील अदानी. आता अदानीची सुलतानी झाली आहे.  जे अदानीला देण्यात आलं, माझं सरकार आलं की ते जीआर फाडून फेकून देईल. 

पंकजा मुंडे बोलल्या आहे, त्यानी खास काम केलं आहे. मला त्यांना धन्यवाद म्हणायचं आहे. भाजपच काम भारी असतं, राज्यात 90 हजार बूथ आहे. इथं नजर ठेवण्यासाठी सगळी माणसं गुजरातहून आणली आहेत. आपल्यावर लक्ष ठेवायला. आता हे फेक नरेटिव्ह नाही. कारण पंकजा बोलल्यानंतर मी बोलतो आहे.

या निवडणुकीत माझी दोन तीन वेळा बॅग तपासली गेली. मी त्या बॅगच्या कंपनीला सांगणार आहे मला त्या बॅगचा ब्रांड अम्बेसेटिर करा. दिवसभर चेकिंग केलं जातंय आणि रात्री बैठका घेतल्या जातात. 

रावण आणि कंस वध, अफजल खानाचा कोथळा मोदीनी काढला असं देखील म्हणतयात. ते म्हणाले डॉ.  बाबासाहेब आंबेडकर याना भारतरत्न मोदीनी दिलं. अल्पसंख्याक आयोगावर एकही बौद्ध समाजाचा माणूस नाही. असं का? यांना त्या त्या समाजाची लोक अशा संस्थांवर नको आहेत. 

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सांगतोय, 8 दिवस थांबा. मी तुम्हाला सोयाबीनला 7 हजार भाव देतो. शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो. सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित मोदीनी ट्विट केलं. त्यानी केलं नाही केलं तर त्यांची अडचण झाली असती. अमित शाह यांनी 370 कलम प्रश्न माझ्यावर भिरकावला आहे. अहो अमित शेठ, तुम्ही विसरताय की शिवसेनेने तुम्हाला 370 कलम हटवताना पाठिंबा दिला होता. हे तुम्ही कसं काय विसरताय? मोदी, अमित शाह यांचं खोटं हिंदुत्व आहे. राज्यात बेकारी वाढली आहे, महागाई वाढली आहे. पण हे लोक 370 कलम हटवलं सांगत मतं मागतात.  

माझ्या मनात गुजराती समाजाबद्दल काही वाईट नाही. मुंबईत राहणाऱ्या गुजराती बांधवांना कधीही त्रास झाला नाही. त्यांना मला सांगायचं आहे की त्यांच्यात आणि गुजरात यामध्ये भिंत बांधली जात आहे. मुंबई मारण्यासाठी हे नीती आयोगाच्या ताब्यात देत आहेत. बुलेट ट्रेन स्टेशन धारावीच्या शेजारी कसं काय? बुलेट ट्रेनने गुजराती लोकांना इथं आणायचं आहे. 

गरज पडली तर एमएमआरडीए रद्द करुन टाकेन. यांनी टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला घालवला. उद्धव ठाकरे एकटा नाही, बाळासाहेब यांनी दिलेलं प्रेम माझ्यासोबत आहे. कोरोना काळात धारावी वाचवल्यानंतर संपूर्ण जगाने कौतुक केलं होतं.

देशाचा पंतप्रधान कसा असावा? ज्या पक्षाच्या मदतीने तुम्ही पंतप्रधान झालात त्यांच्या अंगावर गद्दारांची फौज सोडली. भाजप आता संकरीत झाला आहे. कारण वेगवगेळ्या विचाराचे बीज त्यामध्ये आहे. ओरिजनल कुठ आहे? सगळीकडे बाडगे आहेत, कोकणात सुद्धा बाडगा आहे. यांना आई मेली तरी चालेल यांना फक्त खुर्ची हवी आहे. बाकी यांना कशाशी घेणं देण नाही.

सगळ्या पक्षांच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान आहे. मात्र मोदींमुळे मतं मिळतात हे खोटं ठरलं आहे. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावावा लागतोय. आता बाळासाहेबांचा फोटो लावून मतांची भीक मागत आहेत. मिंध्या, तू का मर्दाची औलाद असलास तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून मैदानात ये. 23 तारखेनंतर मिंध्या जरूर जा त्यांचे बूट चाट. तुम्हाला 23 तारखेनंतर संरक्षणाची गरज लागणार आहे. 

ही बातमी वाचा : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊसSupriya Sule Vs Atul Benke|माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, हिम्मत असेल तर.. सुळेंची बेनकेंवर टीकाMuddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Embed widget