एक्स्प्लोर
Hartalika Teej 2024 : आज हरितालिकेचा दिवस...पूजेची योग्य वेळ , शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेसाठी लागणारे साहित्य जाणून घ्या
आज हरितालिकेचा व्रत आहे. देशातील अनेक भागांत हरितालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरितालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे.

Hartalika Teej 2024
1/7

हिंदू पंचांगानुसार, आज हरितालिकेचा व्रत आहे. देशातील अनेक भागांत हरितालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरितालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे.
2/7

या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.
3/7

हरितालिका पूजा विधी - हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी.
4/7

शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी.
5/7

पंचांगानुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 वाजता तृतीया तिथी सुरू झाली आणि 6 सप्टेंबर रोजी म्हणजेच (आज) पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. आज तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असेल.
6/7

पूजेसाठी लागणारे साहित्य - तुम्ही जर हरितालिकेची पूजा करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काही वस्तूंची यादी असणं गरजेचं आहे.
7/7

वाळू, बेलपत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, रांगोळी, दूध, मध, पाण्याचा कलश, तूप, तेल, चंदन, शंख, घंटा, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, अक्षता, कापूर, कोरे वस्त्र, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य तुम्हाला लागणार आहे.
Published at : 06 Sep 2024 11:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बुलढाणा
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
