एक्स्प्लोर
Shani Amavasya 2025 : अवघ्या काही तासांतच सुरु होतोय भयंकर 'षडाष्टक योग'; शनि अमावस्येला 'या' 3 राशींवर घोंगावणार संकटाचं वादळ
Shani Amavasya 2025 : आज संध्याकाळी 4 वाजून 32 मिनिटांनी शनी आणि सूर्य ग्रह एकमेकांच्या 150 डिग्री अंतरावर असून षडाष्टक योग निर्माण करणार आहेत.
Shani Amavasya 2025
1/7

वैदिक शास्त्रानुसार, आज म्हणजेच 23 ऑगस्ट 2025 रोजी शनि अमावस्या आहे. या दिवशी शनी आणि सूर्य ग्रह मिळून षडाष्टक योग निर्माण करणार आहेत. हा योग फार भयानक मानला जातो. त्यामुळे काही राशींनी या अमावस्येच्या दिवशी सावधान राहण्याची गरज आहे.
2/7

षडाष्टक योग वैदिक ज्योतिष शास्त्रात एक दुर्मिळ असा योग आहे. जेव्हा दोन ग्रहांच्या मध्ये त्यांच्या स्थितीने सहाव्या आणि आठव्या चरणाचा संबंध जुळून येतो. या योगाच्या अशुभ प्रभावाने आर्थिक नुकसान, मानसिक तणाव आणि नोकरीत समस्या निर्माण होऊ शकतात.
3/7

आज संध्याकाळी 4 वाजून 32 मिनिटांनी शनी आणि सूर्य ग्रह एकमेकांच्या 150 डिग्री अंतरावर असून षडाष्टक योग निर्माण करणार आहेत. त्यामुळे कर्क, मीन आणि मिथुन राशींच्या लोकांनी या काळात सावध राहण्याची गरज आहे.
4/7

या दरम्यान कर्क राशीच्या कामकाजात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. यासाठी पूर्णपणे नशिबावर अवलंबून राहू नका. मेहनत करत राहा. त्यानंतर तुम्हाला यश मिळेल. तसेच, तुमच्या रिलेशनशिपमध्ये देखील अनेक वाद निर्माण होऊ शकतात.
5/7

शनि अमावस्येला जुळून येणारा दुर्मिळ योग मिथुन राशीसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच, नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या दरम्यान तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत सावध राहा.
6/7

मीन रासीसाठी हा काळ फार कठीण ठरणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात तसेच नोकरीत जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच, या काळात कोणत्याही प्रकारे पैशांची गुंतवणूक करु नका. तुम्हाला धनहानीचा सामना करावा लागू शकतो.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 23 Aug 2025 12:38 PM (IST)
आणखी पाहा























