एक्स्प्लोर
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: आझाद मैदान मराठ्यांच्या गर्दीनं तुडुंब भरलं, रस्त्यांवरही गर्दी जमण्यास सुरुवात; मुंबईच्या वेशीवरही हजारो गाड्यांचा ताफा
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: आझाद मैदानात 5 हजार जणांना परवानगी देण्यात आली असली तरी सकाळी अवघ्या काही मिनिटांमध्ये आझाद मैदान हे गर्दीने फुलून गेलं आहे.
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha
1/11

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीपासून सुरू केलेला प्रवास अखेर आझाद मैदानामध्ये पोहोचला आहे.
2/11

मुंबईमध्ये आज मराठ्यांचा महाएल्गार होत असून अभूतपूर्व गर्दी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी झाली आहे.
3/11

मुंबईच्या वेशीपासून आझाद मैदानापर्यंत सर्वत्र फक्त मराठा वादळ दिसून येत आहे.
4/11

अजूनही आंदोलक ग्रामीण भागातून नवी मुंबईत दाखल होत आहेत.
5/11

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील मराठा आंदोलकांना नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती.
6/11

आंदोलनाला परवानगी एक दिवसाची असली तरी अभूतपूर्व गर्दी या आंदोलनाच्या निमित्ताने झाली आहे.
7/11

आझाद मैदानात 5 हजार जणांना परवानगी देण्यात आली असली तरी सकाळी अवघ्या काही मिनिटांमध्ये आझाद मैदान हे गर्दीने फुलून गेलं आहे.
8/11

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून ते आझाद मैदान ते पार मुंबईच्या वेशीपर्यंत मराठ्यांची गर्दी दिसून येत आहे.
9/11

त्यामुळे गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आता मुंबई पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
10/11

वाहतुकीवर सुद्धामोठा ताण निर्माण झाला आहे. दहा वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानातील आंदोलनस्थळी आगमन झालं.
11/11

एकदिवसीय आंदोलन आझाद मैदानात केल्यानंतर पुढील रणनीती काय ठरवणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे
Published at : 29 Aug 2025 10:06 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
बातम्या
छत्रपती संभाजी नगर
























