स्त्री - राजकुमार राव आणि श्रध्दा कपूरचा हा चित्रपट वर्षानुवर्षे चालणारा आहे. चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याला प्रेक्षकांचा तुडूंब प्रतिसाद मिळाला होता. कारण चित्रपटात राजकुमार राव सारखा कलाकार तर होताच पण पंकज त्रिपाठीने साकारलेल्या पात्रालाही चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. (Social Media)
2/6
नानू की जानू - अभय देओलचा हा चित्रपट पण याच जॅानरचा आहे जो तुम्हाला हसवेलही आणि घाबरवेलही. या चित्रपटात अभय देओल सोबत पत्रलेखाही दिसून आलेली होती. ज्यात अभयने लॅन्ड माफिया हे पात्र साकारले होते. जो एका भूतासोबत व्यवहार करतो. खूपच वेगळ्या कथेवर भाष्य करणारा हा चित्रपट तुम्ही बघू शकता. (Social Media)
3/6
लक्ष्मी - मागच्याच वर्षी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' चित्रपट तुमचे खूप मनोरंजन करेल. चित्रपट बघताना जितके हसू येते, तेवढेच त्यातील काही सीन घाबरवतात देखील. (Social MediSTREEGa)
4/6
गोलमाल अगेन - 2017 साली प्रदर्शित झालेली अजय देवगन, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि अर्शद वारसी यांचा हा चित्रपट जर तुम्ही पाहिला नसेल तर लगेच जाऊन बघा. रोहित शेट्टीने चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि चित्रपटात तब्बू आणि परिणीती चोप्रासारखे चमकते तारे देखील होते. (Social Media)
5/6
गो गोवा गॅान - 3 मित्रांची ही गोष्ट, जे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याला जातात. पण तिथे जाऊन वाटतं चित्रपटात जोम्बीज चा तडका आहे आणि चित्रपट तुम्हाला हसवत हसवत घाबरवून जातो. जर स्वत:ला मनोरंजित करायचं असेल तर हा चित्रपट तुम्हाला नक्की पाहायला हवा. (Social Media)
6/6
भुलभुलैया - 2007 साली प्रदर्शित झालेला अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाइनी आहूजा यांचा हा चित्रपट खूपच शानदार आहे. चित्रपटाचे कथानक खूपच भन्नाट, प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे होते. चित्रपटाचा क्लायमेक्स प्रेक्षकांना खूर्चीवर खिळवून ठेवतो. (Source - Social Media)