एक्स्प्लोर
Pomegranate : चार वर्षानंतर भारतातून अमेरिकेत डाळिंबाची निर्यात
तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर अमेरिकेला (America) प्रायोगिक तत्वावर डाळिंबांची निर्यात (Pomegranate Export) करण्यात आली आहे.

agriculture News Pomegranate exports
1/9

तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर अमेरिकेला (America) प्रायोगिक तत्वावर डाळिंबांची निर्यात (Pomegranate Export) करण्यात आली आहे.
2/9

डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे 2018 पासून अमेरिकेने भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
3/9

केंद्र सरकार, प्लांट क्वारंटाइन, इंडिया यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा केल्यानंतर 2022 पासून निर्यातबंदी उठवली होती. त्यानंतर काही नियम आणि अटी घातल्या होत्या. त्यानंतर डाळिंबाच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळं आाता डाळिंबाची 450 किलो डाळिंब विमानाने न्यूयॉर्कला पाठवण्यात आले आहे.
4/9

कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था (एनपीपीओ), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि आय.एन.आय फार्म प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील केंद्रावरुन निर्यातीचा शुभारंभ
5/9

या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास श्रीमती सुधांशू यांनी यावेळी व्यक्त केला.
6/9

डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं अमेरिका देशाने भारतातून डाळिंबाची आयात करण्यास 2017-18 मध्ये बंदी घातली होती.
7/9

अपेडा आणि एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरित्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी वारंवार चर्चा केली असता मानकांच्या आधारे 2022 मध्ये निर्यात बंदी उठवण्यात आली होती.
8/9

डाळिंब फळाविषयी निश्चित केलेल्या मानकानुसारच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे भाजीपाला प्रक्रिया केंद्र, वाशी, नवी मुंबई येथील सुविधा केंद्रावरुन डाळिंबाचे 150 खोके (450 किलो) अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे हवाईमार्गे पाठवण्यात आल्याची माहिती उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी दिली आहे.
9/9

भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सीडंट आहेत. त्यामुळं भारतीय डाळिबांना अमेरिकेत मोठी मागणी आहे.
Published at : 29 Jul 2023 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
