एक्स्प्लोर
Advertisement
मंत्रालयात महिलेची सहाव्या मजल्यावरुन उडी, जाळीमुळे प्राण वाचले
दुपारच्या सुमारास मंत्रालयात आलेल्या या महिलेने मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली. मात्र पहिल्या मजल्यावर जाळी लावली असल्याने या तरुणीचा जीव वाचला. आता या तरुणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आहे. ही तरुणी उल्हासनगर येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई : मंत्रालयात येत एका महिलेने सहाव्या मजल्यावरुन उडी मारली मारल्याची घटना आज घडली. मात्र जळीवर पडल्याने तिचा जीव वाचला आहे. पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलं आहे. या महिलेला मरिन ड्राइव्ह पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. दुपारच्या सुमारास मंत्रालयात आलेल्या या महिलेने मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली. मात्र पहिल्या मजल्यावर जाळी लावली असल्याने या महिलेचा जीव वाचला. आता या महिलेला मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आहे. ही महिला उल्हासनगर येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रियंका गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीसांना मारहाण प्रकरणात तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत ज्यूस सेंटर सुरु ठेवत असल्याने पोलिसांनी कारवाई करत तिच्या पतीला अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. पतीला सोडविण्याच्या मागणीसाठी ती मंत्रालयात आली होती. याच मागणीतून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
काहीच दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक असलेल्या 43 वर्षीय हर्षल सुरेश रावतेचा मृत्यू झाला.
तर अहमदनगरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अविनाश शेटेने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशनं मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.
तसेच मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.
मंत्रालयात येऊन आत्महत्या किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन तत्कालीन फडणवीस सरकारने मंत्रालयाच्या पहिल्या मजल्याला जाळी बसवली आहे.
संबंधित बातम्या :
सामान्यांच्या तक्रारी सोडवा, आत्महत्यासत्रानंतर सरकारच्या सूचना
आत्महत्या टाळण्यासाठी मंत्रालय इमारतीच्या भिंतीला जाळ्या
मंत्रालयाच्या 5 व्या मजल्यावरुन उडी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
मंत्रालयाबाहेर 25 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement