एक्स्प्लोर

Yavatmal Crime News : नायब तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला रिव्हॉल्वरसह अटक; खनिज तस्करांच्या कारवाईतून केला होता हल्ला 

Yavatmal Crime News : यवतमाळच्या महागाव येथील तस्करीला आळा घालण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या एका आरोपीला यवतमाळ एलसीबी पथकाने रिव्हॉल्वरसह अटक केली आहे.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील तस्करीला आळा घालण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या एका आरोपीला यवतमाळ (Yavatmal Crime) एलसीबी पथकाने रिव्हॉल्वरसह अटक केली आहे. ही कारवाई महागाव परिसरात कलगाव टी पॉईंट परिसरात करण्यात आली. सुरज नरवडे असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून तो महागाव (Yawatmal News) येथील संभाजी चौक येथील रहिवासी आहे. महागाव परिसरात या आरोपी विरोधात यापूर्वी देखील मोटार सायकल चोरी, रेती चोरी, दारू संबंधित अनेक गुन्हे दाखल आहे. हा आरोपी परिसरात रिव्हॉल्वर घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे महागाव शहरातील कलगाव टी पॉईंट परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून रिव्हॉल्वरसह मॅग्जीनमध्ये असलेले एक जिवंत काडतूसही जप्त केले. 

रिव्हॉल्वर मॅग्जीनसह आरोपीला बेड्या

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून रेती तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या तस्करांच्या विरोधात शासनाच्या वतीने कंबर कसली आहे. असे असतांना या तस्करांची शिरजोरी वाढली असून या विरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला घडवून आणल्याचे प्रकार घडत आहे. अशीच एक घटना यवतमाळच्या महागाव येथे 23 ओक्टबरच्या रात्री घडली. ज्यामध्ये रेती तस्करा विरोधात कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदार विश्वंभर राणे यांच्यावर रेती तस्करांनी धक्काबुक्की करत प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान महागाव परिसरात कलगाव टी पॉईंटजवळ हा आरोपी रिव्हॉल्वर घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत या आरोपीला अटक केली. यावेळी या आरोपी कडून एक रिव्हॉल्वर,मॅग्जीनसह एक जिवंत काडतू जप्त केले. 

अवैध तस्करी विरोधात कारवाई केल्याने हल्ला

23 ओक्टबरच्या रात्री महसूल विभागाला मोरथ ते वाकोडी पूस नदी पात्रात ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेती तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती नायब तहसीलदार विश्वंभर राणे यांना मिळाली. त्यांनी कोतवालासह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन धाड टाकली. त्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. मात्र अचानक टाकलेल्या या धाडीनंतर त्यातील काही मजुरांना पळ काढण्यास यश आले. दरम्यान या कारवाई मध्ये एका रेती तस्कराने महसूल कर्मचारी पथकातील एकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तहसीलदारांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. अशात आपला बचाव करत कारवाई करणाऱ्या पथकाने माघार घेत थेट पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget