एक्स्प्लोर

Yavatmal News: धक्कादायक! गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर 1 लाखाहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी मारला डल्ला

Yavatmal News: गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर राज्यभरातील 1 लाखाहून अधिक शासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Yavatmal Crime News यवतमाळ: गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर राज्यभरातील 1 लाखाहून अधिक शासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकट्या  यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातील 3 हजार 187 कर्मचाऱ्यांनी गरिबांचे हक्काचे स्वस्त धान्य लाटल्याची आकडेवारी सामोर आली आहे. रेशन कार्ड वरील व्यक्तीचे आधार कार्ड लिंक करण्यात आले असल्याने त्यावरून हा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर विषयाची दखल घेत यवतमाळ(Yavatmal News) जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी पळताळणी करून शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

गरिबांचे हक्काचे धान्य लाटल्याचा प्रकार उघड 

गरीब कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा, अंतोदय अन्न योजना राबविण्यात येत असते. यातून  लाभार्थी कुटुंबाला दर महिन्याला एका रेशन कार्डवर 35 किलो धान्य दिले जाते. तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रतिव्यक्ती 5 किलो धान्य दिले जाते. मात्र गरिबांच्या धान्यावर डल्ला मारून या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रवृत्तीचे दर्शन घडविले असल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कारवाईचे आदेश दिला असून पुढे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

या विषयी जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी सुधाकर पवार म्हणाले की, शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा  विभागाच्यावतीने  9 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील सर्व डीओसोला पत्र दिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, राज्यातील पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याकरिता या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि योजनेतील अपात्र लाभार्थी वगळण्याकरिता आमच्या विभागांनी वित्त विभागाच्या सेवा प्रणालीमधील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा डाटा बेस आहे, तो आमचे विभागाच्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली सोबत पडताळण्यात आलेला आहे. त्यानुसार काही अधिकारी, कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आलेले आहे. म्हणून जे काही शासकीय कर्मचारी, अधिकारी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत, अशा शिधापत्रिकेची माहिती राज्य शासनाने जिल्ह्याच्या तालुकास्तरीय सर्व कार्यालयाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्या माहितीनुसार सर्व सदर शिधापत्रिकांची पडताळणी करून शासन निर्णयानुसार या कुठल्या योजनांमध्ये हे लाभार्थी वर्ग करण्यात प्राप्त असतील, त्या योजनेमध्ये वर्ग करण्याची कारवाई फेब्रुवारीच्या 20 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे शासनाने निर्देश जारी करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार म्हणाले. 

20 फेब्रुवारी पर्यंत पडताळणी करून कारवाईचे आदेश 

 आम्ही जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांना ही माहिती दिलेली आहे आणि 20 फेब्रुवारी पर्यंत प्राप्त माहितीची पडताळानी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे. प्राप्त माहिती नुसार राज्यामध्ये 1 लाखो 262 असे लाभार्थी आहेत. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3187 लाभार्थ्याची यादी प्राप्त झाली आहे.  जिल्हा तपास यंत्रणेमार्फत या सर्व प्रकाराची तपासणी केली जाईल. ज्या शिधापत्रिकेमध्ये ज्या लाभार्थ्यांचा सहभाग आहे. यांची देखील पडताळणी केली जाईल. आणि त्यानंतर विशिष्ट योजनेमध्ये वर्ग करण्यास पात्र ठरतील त्यानुसार शासन नियमानुसार  त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Oath as Maharashtra DCM :मी एकनाथ शिंदे..उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतली शपथABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines Oath ceremony 6PM 04 December 2024Ajit Pawar Oath as Maharashtra DCM : मी अजित... उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार पुन्हा एकदा विराजमानDevendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
देवेंद्र फडणवीसांनी रचला इतिहास, ते पुन्हा आले, कोणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
Maharashtra CM Oath Ceremony : ते पुन्हा आलेच... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष
ते पुन्हा आलेच... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली शपथ, आझाद मैदानात जल्लोष
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Eknath Shinde Deputy CM oath: नाथांचा नाथ एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, शिवसैनिक भारावले
नाथांचा नाथ एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, शिवसैनिक भारावले
Embed widget