एक्स्प्लोर

Eknath Shinde Deputy CM oath: नाथांचा नाथ एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, शिवसैनिक भारावले

Eknath Shinde Maharashtra DCM: एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली काम करतील.

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानात संपन्न झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या या शपथविधी सोहळ्याला (Mahayuti Oath Taking Ceremony) विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक मान्यवर, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि भाजपचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

तत्पूर्वी आज सकाळपासून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत संभ्रम होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गृहमंत्रीपदाची मागणी लावून धरली होती. मात्र, भाजप गृहखाते शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सामील व्हायचे की नाही, या विचारात होते. मात्र, एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात नसल्यास चुकीचा राजकीय संदेश जाऊ शकतो, ही बाब ध्यानात घेऊन भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी प्रयत्नशील होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे की नाही, हा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम ठेवला होता. अखेर शपथविधीसाठी अवघे दोन तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात गेले आणि त्यांनी राज्यपालांकडे एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचे पत्र सुपूर्द केले होते.

एकनाथ शिंदे यांनी आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जातीने प्रयत्न केले होते. त्यांनी बुधवारी वर्षा बंगल्यावर दोनवेळा जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. वर्षा बंगल्यावरील अँटी-चेंबरमध्ये उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीचा भाजप नेतृत्त्वाकडून विचार केला जाईल, असे सांगितले. आपल्याला एकत्र मिळवून सरकार चालवायचे आहे. आपण कोणालाही साईड कॉर्नर करणार नाही. आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे. तुम्ही आज शपथ घेतली नाही तर चुकीचा अर्थ काढला जाईल, असे फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले. याशिवाय, शिवसेनेच्या सगळ्या आमदारांकडून काल रात्रीपासून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु होते. तुम्ही मंत्रिमंडळात असणे महत्त्वाचे आहे. तुमच्याशिवाय आम्हीदेखील मंत्रिमंडळात बसणार नाही, अशी निर्वाणीची भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली. या सगळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला होता. 

आणखी वाचा

उदय सामंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट, एकनाथ शिंदें म्हणाले होते, 'उपमुख्यमंत्रीपद नको, मी संघटना वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 8PM 25 March 2025Job Majha : NMDC स्टील लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 25 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025Majha Mudda EP 06 : औरंगजेबची कबर ते वाघ्या कुत्रा प्रकरण, महत्वाच्या मुद्द्यांपासून नेते भरकटतायत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Embed widget