एक्स्प्लोर

Yavatmal News: अवैधरित्या देशीकट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Yavatmal Crime News:अवैधरित्या दोन जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Yavatmal Crime News यवतमाळ: अवैधरित्या दोन जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने  (Yavatmal Police) अटक केली.  सोमवारी पहाटेच्या सुमारास यवतमाळच्या (Yavatmal Crime News) उमरखेड-महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या धाब्याजवळ एक इसम गावठी पिस्टलसह येणार असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला  (Yavatmal Crime News)मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून इसमाची तपासणी केली असता, 30 हजार रुपये किंमतीचा देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुस आढळून आले. याप्रकरणी ताईफखान जहांगिरखान पठाण (21 वर्षे रा. सवेरा कॉलनी, प्रिन्स गॅरेज उमरखेड) याला अटक करण्यात आली आहे.

देशीकट्टा आणि  दोन जिवंत काडतुस जप्त 

एकीकडे राज्यात सातत्याने गोळीबार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आल्याचे बोलले जात आहे. अशातच गोळीबारांच्या घटनेत हल्ली मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. इतर राज्यातून कमी किमतीत गावठी बंदूक सारखे शस्त्र सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी विश्वात या  गावठी कट्टा आणि इतर शस्त्रांचा वापर सर्रास होताना दिसत आहे. अशीच एक कारवाई यवतमाळ पोलिसांनी उघडकीस आणली आहे.

यवतमाळच्या उमरखेड शहरातील महागाव रोडवरील संजेरी धाब्याजवळ एक इसम गावठी पिस्टलसह येणार असल्याची गोपनिय माहिती  स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून इसमाची तपासणी केली असता त्याच्या जवळ 30 हजार रुपये किंमतीचा देशीकट्टा आणि  दोन जिवंत काडतुस आढळून आले. याप्रकरणी ताईफखान पठाण याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. 

संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल 

पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्याला देशीकट्टा आणि  दोन जिवंत काडतुस बाबत विचारणा केली असता संशयित आरोपी ताईफ खान जहांगीर खान पठाण याने मागील तीन वर्षापूर्वी अमजदखान सरदार खान (रा.पुसद ) याच्याकडून एक देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुस खरेदी केल्याचे सांगीतले.  मात्र त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी ताईफखान जहागीर खान पठाण आणि अमजद खान सरदार खान या दोघांविरोधात पीएसआय अमोल राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड यांनी केली. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. ताईफखानने हे हत्यार खरेदी करण्यामागील नेमका काय उद्देश होता याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
Nagpur Crime News: लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
Satara Crime News: म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
म्हसवडमध्ये पोलिसांच्या कारवाईवरून वाद; अल्पवयीन मुलाची बाजारातून धिंड? इंस्टाग्राम पोस्टवरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Embed widget