Yavatmal News: यवतमाळ हादरलं, शहरात चोवीस तासात दोन हत्या, मागील 90 दिवसांत 21 हत्या
Yavatmal News: जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाचा निर्घृण खून करण्यात आला. तर दुसरी हत्या अनैतिक संबंधातून घडली आहे.
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) 24 तासात दोघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे नाशिक शहर हादरुन गेले आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाचा निर्घृण खून करण्यात आला. तर दुसरी हत्या अनैतिक संबंधातून घडली आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील 90 दिवसांत 21 हत्या झाल्या. तर मागील 24 तासात दोघांची हत्या करण्यात आली. त्यामुळे यवतमाळ शहर पूर्णतः हादरून गेले आहे. रात्रीच्या सुमारास एका युवकाची हत्या झाली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रवीण बर्डे असे मृताचे नाव आहे. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जीवानिशी ठार केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या पंजाबराव कृषी विद्यापीठ जवळ घडली. या प्रकरणी रजनीस इंगळे आणि त्याचा एक साथीदार दोघांना लोहारा पोलिसांनी अटक केली असून मृत व्यक्तीचे मारेकऱ्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
तर दुसऱ्या घटनेत यवतमाळतील बेडकी पुरा येथे काल साडेअकरा वाजताच्या दरम्यान दुसरी हत्या झाली. देवांश सावरकर अशा मृत व्यक्तीचे नाव आहे. मारेकर्यांनी चाकूने हल्ला चढविला त्यात तो जखमी झाला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. 15 दिवसांपूर्वी त्याचा काही युवकासोबत वाद झाला होता. त्याचा राग मनात ही हत्या करण्यात आली. ही घटना शहर पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
एकंदरीतच जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून एका मागून एक होत असलेल्या हत्याच्या घटनांमुळे यवतमाळ शहर पूर्णतः हादरून गेले आहेत. आता यवतमाळ जिल्हा पोलीस दलासमोर अशा घटनांवर रोख लावण्याचे आव्हान आहे. यवतमाळ जिल्हा गुन्हेगारी क्षेत्रात अव्वल ठरला जात आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ जिल्हा गुन्हेगारीत सर्वात वरच्या लिस्टवर आहे. या सर्व घटनामध्ये कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचे आढळून आले. पती-पत्नीतील वाद, मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंध तर कुठे अवैध व्यवसायातील वर्चस्वाची लढाई अशा प्रकारच्या कारणांनी या घटना घडल्या. या सर्व बाबीचा विचार केला तर जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य बिगडत चालले आहे हे स्पष्ट आहे.