Yavatmal Farmers : आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आमदार ससानेंची 2 हजारांची मदत, गावात चर्चा होताच पुन्हा पाठवले 3 हजार
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आमदार नामदेवराव ससाने (MLA Namdev Sasane) यांनी दोन हजारांची मदत दिली होती. मात्र, गावात चर्चा होताच पुन्हा त्यांनी तीन हजार रुपये पाठवले होते.
Yavatmal Farmers : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील हिरामणनगर-निंगणूर येथील शेतकरी चंपत नारायण जंगले यांनी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आमदार नामदेवराव ससाने (MLA Namdev Sasane) यांनी भेट देऊन बंद लिफाफ्यामध्ये दोन हजारांची मदत दिली होती. या मदतीनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र, या प्रकरणाचा गाजावाजा होताच आमदार ससाणे यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून पुन्हा तीन हजार रुपये पाठवून दिले आहेत. दरम्यान, आता या पैशातून मी सासूचा दवाखना करु की शेतीसाठी खतपाणी करु की लेकरांना खाऊ घालू असा सवाल धुरपदा जंगले यांनी केला आहे.
ही मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
एकीकडे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आमदार नामदेवराव ससाने यांनी पाच हजार रुपयांची मदत केली तर दुसरीकडे पक्षाने नुकत्याच आयोजित केलेल्या दहीहांडीत कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित राहत पुढील वर्षी दहीहंडीचे बक्षीस दोन लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या, शेतीचा आधार गमावलेल्या त्या महिलेला ही आमदार नामदेवराव ससाने यांनी केलेली दोन हजारांची मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळणारी असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले होते. याबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच आमदारांच्या या कृतीचा उमरखेड मतदारसंघातही निषेध व्यक्त केला जात आहे.
एवढ्या मदतीत नेमकं कोणतं काम करावं
आमदारांनी पहिल्यांदा दोन हजार रुपयांची मदत केली होती. त्यानंतर त्यांनी तीन हजार रुपये दिल्याची माहिती आत्महत्या केलेले शेतकरी चंपत नारायण जंगले यांच्या पत्नी धुरपदा जंगले यांनी दिली. आता या पैशातून मी सासूचा दवाखना करु की शेतीसाठी खतपाणी करु की लेकरांना खाऊ घालू असा सवाल धुरपदा जंगले यांनी केला आहे. एकूणच आमदार नामदेवराव ससाने यांनी केलेली मदत ही खूप तुटपुंजी आहे. त्यामुळं एवढ्या मदतीत नेमके कोणते काम करावे असा सवाल धुरपदा जंगले यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: