एक्स्प्लोर

Yavatmal Crime News : कोंबड्यांच्या झुंजींवर बंदी असताना देखील यवतमाळच्या घाटंजीत लाखोंची उधळपट्टी; झुंजीचा व्हिडीओ व्हायरल

Yavatmal Crime News : कायद्याने बंदी घातलेल्या कोंबड्यांच्या रक्तरंजित झुंजींचा व्हिडीओ यवतमाळच्या घाटंजीतून पुढे आला आहे. या झुंजींवर लाखोंची उधळपट्टी केल्याची देखील बाब पुढे माहिती समोर आली आहे.

यवतमाळ : पशु-पक्ष्यांची झुंज लावण्यास कायद्याने बंदी असली तरी अनेक गावात या स्पर्धा बिनधास्तपणे भरवल्या जातात. असाच एका कोंबड्यांच्या रक्तरंजित झुंजीचा (cockfights in Maharashtra) व्हिडीओ यवतमाळच्या (Yavatmal Crime News) घाटंजी तालुक्यातील इंझाळा येथून समोर आला आहे. अवैध पद्धतीने सुरू असलेल्या या झुंजीसाठी जिल्ह्यासह विविध राज्यातील हौशी नागरिक याठिकाणी दाखल झाले असल्याचे बघायला मिळाले. असाच एक कोंबड्यांच्या झुंजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होत आहे. मात्र बंदी असूनही अशा झुंजी खुलेआम सुरू असल्याने  पोलिसांवर  शंका उपस्थित केली जात आहे.

कोंबड्यांच्या झुंजींवर लाखोंची उधळपट्टी

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील इंझाळा बेडा गावात अवैध पद्धतीने कोंबड्यांची झुंज लावण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यासह चंद्रपूर, वणी, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, घोन्सा आणि लगतच्या तेलंगाना राज्यातील नागरिक इंझाळा बेडा गावात दाखल होत असतात. आठवड्यातील रविवार, शुक्रवार, आणि बुधवारी या झुंजी लावल्या जातात. ज्यामध्ये अवैध पद्धतीने सुरू असलेल्या या कोंबड्यांच्या झुंजीवर लाखो रुपयांची उलाढाल होते. पोलिसांच्या आशीर्वादाने घाटंजी येथील मटका व्यावसायिक ही कोंबड्याची झुंज भरवत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. ही झुंज बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करत असतात. असाच एक कोंबड्यांच्या झुंजींचा व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होताच एकाच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

आंध्र प्रदेशमध्ये तीन दिवसांत 900 कोटींची उलाढाल

2019 मध्ये आंध्र प्रदेश येथे कोंबडा झुंजीत केवळ तीन दिवसांत 900 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ही बाब लक्षात घेता, कोंबडा झुंजी अधिकृत केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच या खेळामुळे कुकुटपालन व कोंबड्यांचे देशीवाण  संरक्षित करण्यास प्रोत्साहन मिळेल. देशात क्रिकेटवरही सट्टा  लावला जातो. पण त्यामुळे क्रिकेटवर बंदी आणण्यात आली नाही. तसेच कोंबड्यांचा आहारासाठी  उपयोग करण्यावरही बंदी नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे कोंबडा झुंजीवर बंदी लागू करणे तर्कहीन आहे, असा दावा चाचरकर यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

न्यायालयाने आणली होती बंदी

राज्यात आयोजित होणाऱ्या कोंबड्यांच्या झुंजी कायमच्या बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते. पशुसंवर्धन कायद्यात अंतर्गत या झुंजींवर बंदी असली, तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे या झुंजी सुरू असल्याने एन. जी. जयसिंहा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.  कोंबड्यांच्या झुंजीत त्यांच्या पायाला छोटा चाकू अथवा धारदार हुक बांधले जातात. ज्यामुळे हे पक्षी घायाळ होतात, किंवा त्यांना कायमचे अंपगत्व येते; बऱ्याचदा त्यांना प्राणही गमवावे लागताे. याशिवाय या झुंजीवर जुगारही लावला जात असल्यामुळे त्यावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी जयसिंहा यांनी याचिकेद्वारे केली होती. न्यायमूर्ती केमकर आणि न्यायमूर्ती कर्णिक यांनी राज्य सरकारला यासंदर्भात त्वरित पावले उचलून, या झुंजींवर कायमची बंदी आणण्याचे आदेश दिले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget