एक्स्प्लोर

Gopichand Padalkar : पवारांची नजर ज्यावर पडली त्याची माती झाली, जो मराठा समाजाचा झाला नाही तो तुमचा कसा होणार? गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका 

Gopichand Padalkar : महाराष्ट्राच्या विरोधात काम करणारा माणूस घरातच असताना सुप्रिया ताईंना (Supriya Sule) तो दिसत नाही अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

यवतमाळ: शरद पवार (Sharad Pawar) यांची नजर आणि सावली ज्या विषयावर पडली, त्याची माती झालेली आहे, जो मराठा समाजाचा झाला नाही, तो तुमचा कसा होईल असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांना जवळचं दिसत नाही, कारण असे महाराष्ट्रच्या विरोधात काम करणारा घरातला माणूस ताईंना दिसत नाही अशीही टीका पडळकर यांनी केली.  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे धनगर जागर यात्रेमध्ये ते बोलत होते. 

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी राज्यभर धनगर जागर यात्रा सुरू केली आहे. अमरावतीमध्ये बोलताना ते म्हणाले की, आता तुम्ही जागा राहा. जर तुम्ही झोपला तर कायमचं झोपणार. एकबाजूने न्यायालयात लढू आणि दुसरीकडे रस्त्यावर लढू. म्हणून मी एकजूट करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी मी फिरतोय. शासनाने धनगर आरक्षणाचा जीआर काढावा ही मागणी आहे. 21 तारखेला जी कमिटी स्थापन केली ती लवकर इतर राज्यात पाठवा. इतर राज्यांनी जीआर कसे काढले याचा त्यांनी अभ्यास करावा. 

अस्सल धनगर भाजपला मतदान करणार नाही, दिलीप ऐतडकर यांचे वक्तव्य

काँग्रेस प्रवक्ते तथा धनगर नेते दिलीप ऐडतकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, धनगरांच्या आरक्षणासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही कोणताही पक्ष म्हणून राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये सांगितले होते की, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. पण दिलं नाही. त्यामुळे पडळकर, तुम्ही आपल्या मित्रांना समजवावे. तुम्ही भाजपचा पान हलवू शकता. सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर जो अस्सल धनगर असेल तो भाजपला मतदान करणार नाही.

धनगरी ताकद दाखवून देणार

येत्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून धनगरांना आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे असं गोपीचंद पडळकर म्हणाले. ते म्हणाले की, जर न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण मिळाले नाही तर त्यासाठी प्लॅन बी म्हणून धनगर जागर यात्रा सुरू करणार. या यात्रेच्या माध्यमातून धनगरांना जागं करणार आणि धनगरी ताकद काय असते हे दाखवून देणार. 

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget