Omicron : चिंताजनक! बूस्टर डोसने ओमायक्रॉनविरोधात पूर्ण संरक्षण नाही : WHO चा इशारा, अधिक प्रभावी लस बनवण्याची गरज
WHO on Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बूस्टर डोसवर (Booster Dose) आधारित लसीकरण अधिक टिकाऊ असण्याची शक्यता नाही. त्यामुळे अधिक प्रभावी लस तयार करावी लागेल.
WHO on Vaccine : जगभरात कोविड-19 चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत मोहीमही राबवली जात आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिली आहे की सध्याच्या लसींचा बूस्टर डोस (Booster Dose) पुरेसा नाही आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी लस विकसित करण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी मंगळवारी चेतावणी दिली की, मूळ कोविड लसींचे बूस्टर डोस देणे हे कोरोनाच्या नव्या प्रकारांविरूद्ध योग्य प्रभावी नाही.
प्रभावी लस तयार करण्याची गरज - जागतिक आरोग्य संघटना
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कोरोना लसीच्या रचने (TAG-Co-VAC) वरील तांत्रिक सल्लागार गटातील तज्ज्ञांनी सांगितले की, विद्यमान लसी गंभीर रोग आणि चिंतेच्या प्रकारांवर प्रभावी आहेत. कोरोनामुळे होणार्या मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी भविष्यात आपल्याला अधिक प्रभावी लस विकसित करणे आवश्यक आहे, जी कोरोनाच्या संक्रमणाला अधिक प्रभावीपणे रोखू शकेल. केवळ नवीन लसींद्वारेच गंभीर रोग आणि मृत्यू रोखणे अधिक चांगल्या प्रकारे केले जाऊ शकते.
WHO तांत्रिक सल्लागार गटाने (TAG-Co-VAC) एका निवेदनात म्हटले आहे की मूळ लसीच्या फॉर्म्युलेशनच्या बूस्टर डोसवर आधारित लसीकरणाचे धोरण योग्य किंवा टिकाऊ असण्याची शक्यता नाही. प्राथमिक माहितीनुसार, विद्यमान लसी नवीन ओमायक्रॉन व्हेरियंट संक्रमित लोकांमध्ये कोरोना रोखण्यासाठी कमी प्रभावी आहे. त्यामुळे केवळ रुग्णांचे संरक्षण करण्यासाठी नवीन लसी विकसित करण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Update : दिलासादायक! मुंबईसह राज्यात रुग्ण वाढ मंदावली
- Omicron : तिसऱ्या लाटेचा धोका! केंद्रीय आरोग्य सचिवांचं राज्यांना पत्र, दिल्या 'या' सूचना
- Coronavirus Cases in India : तिसरी लाट धडकली? गेल्या 24 तासातील नव्या रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या जवळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha