एक्स्प्लोर

नो सेक्स, नो मॅरेज नो डेटिंग...डोनाल्ड ट्रम्प निवडून येताच महिलांमध्ये '4B मुव्हमेंट'ची तुफान चर्चा; अमेरिकेत नेमकं चाललंय तरी काय?

सध्या अमेरिकेत 4b movement ची चांगलीच चर्चा आहे. या मुव्हमेंटच्या माध्यमातून महिलांमध्ये नो सेक्स, नो डेटिंग, नो मॅरेज आणि नो चाईल्ड याबाबत चर्चा केली जात आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेत आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आलं आहे. हे सरकार येताच अमेरिकेत 4B मुव्हमेंटची चर्चा चालू झाली आहे. विशेषत: महिला या 4B आंदोलनाला पाठिंबा देताना दिसतायत. याच पार्श्वभूमीवर ही 4B मुव्हमेंट नेमकी काय आहे? या आंदोलनाचा उगम नेमका काय आहे? या आंदोलनाच्या माध्यमातून महिला नेमकी काय मागणी करत आहेत? हे जाणून घेऊ या... 

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच 4B आंदोलनाची चर्चा

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार, हे स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेत अनेक महिलांमध्ये या 4B मुव्हमेंटची चर्चा सुरू झाली होती. 2022 साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात मोठा निर्णय दिला. या निर्णयाअंतर्गत रो विरुद्ध वेड या खटल्यातील निर्णय बदलून महिलांना गर्भपाताचा असलेला राष्ट्रीय अधिकार संपुष्टात आणण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यामुळेच ट्रम्प यांना विरोध म्हणून अमेरिकेच्या महिलांत 4B मुव्हमेंटची चर्चा चालू झाली आहे. 

4B आंदोलन नेमकं काय आहे? 

खरं म्हणजे या आंदोलनाची सुरुवात दक्षिण कोरियात 2019 साली झाली होती. 4B म्हणजे दक्षिण कोरियातील एकूण चार शब्द आहेत. त्याचं इंग्रजित भाषांतर करायचं झाल्यास 4 NO असं करता येईल.

4B मधील चार ते चार शब्द कोणते? 

बिहोन (Bihon)- म्हणजे भिन्नलिंगी म्हणजेच पुरुषाशी लग्न करायचं नाही.
 
बिकुलसन (Bichilsan- कोणतही मुल नाही 

बियोनाए (Biyeonae)- पुरुषांसोबत डेटिंगला जायचं नाही
 
बिसेकसेउ (Bisekseu)- भिन्निलिंगी म्हणजेच पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवायचे नाही

महिलांना सन्मान मिळावा म्हणून आंदोलनाचा जन्म

म्हणजेच 4B आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या महिला डेटिंग, लग्न, लैंगिक संबंध, मूल जन्माला घालण्याविरोधी भूमिका घेताना दिसतात. लग्नानंतर महिलांवर संसाराचं ओझं येतं. त्यांच्यावर अनेक गोष्टी लादल्या जातात. त्यामुळेच नोकरी आणि संसार असं दोन्ही सांभाळून महिलांची फरफट होते. हीच हालअपेष्टा थांबावी, महिलांना सन्मान मिळावा म्हणून या आंदोलनाचा जन्म झाला. 

दक्षिण कोरियातून आंदोलनाला सुरुवात

दक्षिण कोरियामध्ये हे आंदोलन 2010 ते 2016 या काळात चांगलेच फोफावले होते. या काळात महिलांसोबत होणारी हिंसा, लैंगिक असमानता याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले होते. याच काळात  #MeToo आंदोलनाचीही जगभरात विस्तार झाला होता. याच काळात दक्षिण कोरियात हे 4B आंदोलन वाढले होते. या आंदोलनामुळे महिला किती सुरक्षित आहेत? महिलांना कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत? अशा प्रश्नांवर दक्षिण कोरियात नव्याने चर्चा चालू झाली होती.    

पितृसत्ताक समाजव्यवस्थेला आंदोलनातून विरोधक

या आंदोलनाच्या माध्यमातून पितृसत्ताक समाजव्यवस्था आणि सामाजिक असमानता याला  थेट आव्हान देण्यात आले. पारंपरिक विवाहपद्धती, मातृत्त्व याला नकार देत महिला एका प्रकारे स्वत:च्या अधिकारासाठीच संघर्ष करत आहेत. महिलांचे होत असलेल्या शोषणाचा आवाज म्हणूनही या आंदोलनाकडे पाहिले जात आहे. 

हेही वाचा :

Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget