एक्स्प्लोर
ट्रम्प यांची इराकला मोकळीक, प्रवेशबंदीचा सुधारित निर्णय

न्यूयॉर्क : अमेरिकेनं इराकच्या नागरिकांना लागू केलेली प्रवेशबंदी उठवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कट्टरपंथीय मुस्लिमांच्या प्रवेशबंदीबाबत सुधारित निर्णय जाहीर केला.
इराकवरील बंदी उठवण्यात आली असली तरी इराण, लिबिया, सुदान, सीरिया, येमेन आणि सोमालिया या सहा देशांवरची बंदी कायम ठेवण्यात आली आहे. ही बंदी केवळ व्हिसा नसलेल्या व्यक्तींसाठीच असेल.
बंदीची अंमलबाजवणी 16 मार्चपासून करण्यात येईल असंही अमेरिकेनं जाहीर केलं आहे. तसंच सीरियन शरणार्थींवर अनिश्चित काळासाठी बंदी उठवण्यात आली आहे.
यंदा अमेरिकेत केवळ 50 हजार शरणार्थींनाच आश्रय दिला जाईल, असंही या निर्णयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. जगभरातून टीकेची झोड उठल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्णयात सुधारणा केल्याचं चित्रं आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement

















