(Source: ECI/ABP News/ABP Majha)
United Airlines flight 328 | अमेरिकेच्या विमानाचे हवेत असताना इंजिन फेल आणि......
Flight UA328: अमेरिकन एयरलाइन्स फ्लाइट 328 चे हवेत असताना इंजिन फेल गेलं आणि सर्वांची भितीने गाळण उडाली. सुदैवाने या विमानाने सुरक्षित लॅन्ड केल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे विमान UA328 हवेत गेल्यानंतर काहीच वेळात इंजिन फेल झाल्याचं लक्षात आलं. या इंजिनला आग लागल्याने लगेच विमानाचे लॅन्डिंग करावं लागलं. अमेरिकन एयरलाइन्स फ्लाइट 328 हे विमान डेन्व्हर ते होनोलूलू असा प्रवास करत होतं. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आता या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Had a front row seat to the entire engine failure on United flight 328. Kinda traumatized to fly United more. #UnitedAirlines pic.twitter.com/5KdJn1BGfV
— Chad Schnell (@ChadSchnell) February 20, 2021
फ्लाइट UA328 हे इंजिनच्या फेल्यूअरमुळे डेनव्हरला लॅन्ड करावं लागलं. हवेत असताना वा जमीनीवर उतरताना कोणतीही जीवितहानी झाली नाही असं अमेरिकन एयरलाईन्सने स्पष्ट केलंय. सदरची घटना 20 फेब्रुवारीला घडली आहे.
Flight UA328 from Denver to Honolulu experienced an engine failure shortly after departure, returned safely to Denver and was met by emergency crews as a precaution. There are no reported injuries onboard. We are in contact with the FAA, NTSB and local law enforcement.
— United Airlines (@united) February 20, 2021
फ्लाइट UA328 हे विमान डेन्व्हर ते होनोलूलू या दरम्यान प्रवास करत होतं. डेन्व्हरवरुन उड्डान घेतल्यानंतर काहीच वेळात या विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाल्याचं लक्षात आलं. एका व्हिडीओमध्ये या विमानाच्या इंजिनला आग लागल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे हे विमान पुन्हा डेन्व्हरला मागे फिरवण्यात आलं आणि त्याचं सुरक्षितपणे लॅन्डिंग करण्यात आलं. आता या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.