एक्स्प्लोर

International Mother Language Day: या देशाचा मातृभाषेसाठी लढा....म्हणून साजरा केला जातोय जागतिक मातृभाषा दिवस

त्या वेळच्या पूर्व पाकिस्तानने (Bangladesh) आपल्या बांग्ला ( Bangla) भाषेला मान्यता मिळावी म्हणून लढा दिला. त्या स्मरणार्थ 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिवस (International Mother Language Day) साजरा केला जातोय.

International Mother Language Day: आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतीक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस युनेस्कोच्या वतीनं (UNESCO) 1999 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. त्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने 2002 साली मान्यता दिली.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस हा बांग्लादेशच्या पुढाकाराने सुरु करण्यात आला. 21 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशातील (त्यावेळचा पूर्व पाकिस्तान) लोकांनी बांग्ला भाषेला मान्यता मिळावी म्हणून पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांविरोधात लढा सुरु केला. त्यांच्या या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय भाषा दिन साजरा केला जातो.

National Women's Day in India : पहिला राष्ट्रीय महिला दिन का आणि कधी साजरा करण्यात आला? जाणून घ्या इतिहास

संयुक्त राष्ट्र संघटनेने जगातील विविध भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी 2008 साल हे आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून साजरं केलं. त्या माध्यमातून स्थानिक भाषांचा विकास, सांस्कृतिक विविधता, आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी गोष्टींचा विकास करण्याचा प्रयत्न केला गेला.

भाषेचा विकास आणि विविधता जपणे ही गोष्ट संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये समाविष्ठ आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे लहान मुलांच्या आकलनात वाढ होते, त्यांचा शैक्षणिक विकास होतो तसेच त्यांचा एकूणच व्यक्तीमत्व विकास होतो. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याला जगभरातील देशांनी प्रोत्साहन द्यावं असं संयुक्त राष्ट्राने आवाहन केलंय.

World Day of Social Justice: का साजरा केला जातो जागतिक सामाजिक न्याय दिन? भारतीय राज्यघटनेत त्याचं काय महत्व आहे?

संयुक्त राष्ट्राने स्थानिक लोकांच्या विकासासाठी आणि बहुसंस्कृतीच्या विकासासाठी 2022-2032 हे दशक 'संयुक्त राष्ट्र स्वदेशी भाषा दशक' (United Nations International Decade of Indigenous Languages) साजरं करण्याचं ठरवलंय.

प्रत्येक दोन आठवड्याला जगातील एक स्थानिक भाषा लुप्त होत आहे असं संयुक्त राष्ट्राचा एक अहवाल सांगतोय. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केवळ ती भाषाच लुप्त होत नाही तर त्यासोबत संपूर्ण संस्कृती आणि वारसा लुप्त होतोय. जगातील एकूण 6000 भाषांपैकी 43 टक्के भाषा या धोक्यात आहेत, त्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत असं संयुक्त राष्ट्राच्या अहवालात सांगण्यात आलंय. त्यापैकी काहीच, शंभरीच्या पटीतील भाषांनाच त्या-त्या ठिकाणच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये स्थान मिळतंय. शंभरपेक्षा कमी भाषा या डिजिटल दुनियेत वापरल्या जातात. त्यामुळे मातृभाषेचं संवर्धन करणं आवश्यक आहे.

World Radio Day | कोट्यवधी लोकांच्या 'मन की बात' करणारा रेडिओ...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget