एक्स्प्लोर
गृहपाठात सुसाईड नोट लिहा, शाळेचा अखेर माफीनामा

लंडन : गृहपाठ म्हणून सुसाईड नोट लिहायला सांगणाऱ्या यूकेमधील शाळेला अखेर माफीनामा मागावा लागला आहे. इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेने 60 किशोरवयीन विद्यार्थ्यांना होमवर्कमध्ये आत्महत्येपूर्वी लिहायच्या चिठ्ठीचा ड्राफ्ट तयार करण्यास सांगितलं होतं. जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांची मॅकबेथ ही शोकांतिका विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला आहे. नाटकात लेडी मॅकबेथ प्राणत्याग करते, हा सर्वात गाजलेला प्रवेश आहे. त्यावर होमवर्क देताना शिक्षिकेने आपल्या प्रियजनांना उद्देशनू अखेरचं पत्र लिहिण्यास सांगितलं. यावर संतापलेल्या पालकांनी शाळेला जाब विचारला. अशाप्रकारचे पत्र लिहिताना आपल्या पाल्याला वैयक्तिक त्रास झाल्याचा दावा पालकांनी केला. अनेक पालकांनी हा अत्यंत असंवेदनशील प्रकार असल्याची टीका केली. त्यानंतर शाळा प्रशासनाला माफीनामा मागावा लागला. लंडनमधील किंडब्रुकमधल्या थॉमल टॅलिस स्कूलमध्ये हा प्रकार घडला. मुख्याध्यापकांनी या प्रकरणाची दखल घेऊन पालकांची माफी मागितली आहे. संबंधित शिक्षिकेवर काय कारवाई झाली, याबाबत माहिती उपलब्ध नाही.
आणखी वाचा























