एक्स्प्लोर

Coronavirus | कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी घरुन काम करण्याची ट्विटरची परवानगी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता ट्विटर या सोशल मीडिया कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे.

सॅन फ्रान्सिस्को : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील जवळपास सर्वच देश लॉकडाऊन आहेत. या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने असे करण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. परिणामी अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. यावर उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास परवानगी दिली आहे. ट्विटर या सोशल मीडिया कंपनीने तर यापुढेचं पाऊल उचललं आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी घरुन काम करण्यास ट्विटरने संमती दिली आहे.

कोरोनाचं संकट गेल्यानंतर कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये येऊ शकतात, असेही कंपनीने सांगितले आहे. या महिन्याच्या सुरूवातीस गुगल आणि फेसबुकने त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे वर्ष संपेपर्यंत घरून काम करण्यास परवानगी दिली आहे. ट्विटरने म्हटले, आहे की, आमचे कर्मचारी घरुन व्यवस्थित काम सांभाळू शकतात. त्यामुळे जर कर्मचाऱ्यांना कायम घरुन काम करायचं असेल तर ते करू शकतात. ट्विटरच्या कार्यालयात परत येण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कंपनी सावधगिरी बाळगून त्यांना प्रवेश देईल. सॅन फ्रान्सिस्को स्थित असलेल्या या कंपनीने आपल्या जगभरातील कार्यालयांमधून 4,000 हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. यामुळे कर्मचार्‍यांना मार्चपासून घरून काम करण्याची परवानगी मिळाली आहे. सप्टेंबरपूर्वी कार्यालये पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.

विशेष रेल्वेनंतर आता एअर इंडियाची देशांतर्गत विशेष विमान सेवा! मंगळवार, 19 मे पासून?

वर्क फ्रॉम होम संस्कृती येणार? कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद आहे. भारतातही गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. उद्योगधंदे बंद असल्याने लाखो लोक बेरोजगार झालेत. परिणामी उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं ज्या कंपन्यांना आणि कार्यलयांना घरुन काम करणे शक्य आहे, अशा कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी देण्याची विनंती सरकारने केली आहे. विदेशात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे. गुगल, फेसबुकने तर 2020 वर्ष संपेपर्यंत घरुन काम करण्यास सांगितले आहे. तर, ट्विटर कायम घरुन काम करू शकता, अशी ऑफरचं कर्मचाऱ्यांपुढे ठेवली आहे. त्यामुळे आगामी काळात वर्क फ्रॉम होम हे कल्चर आलं तर आश्चर्य वाटायला नको.

Lockdown 4.0 | लॉकडाऊन 4.0 कसं असेल? कुठल्या नियमांबाबत शिथिलता?

महत्त्वाच्या बातम्या

USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
400 वर्ष जगणारा मासा, 150 वर्षानंतर देतो पिलांना जन्म, तब्बल 10 वर्ष पिलांना वाढवतो पोटात, नेमका कुठे आढळतो हा मासा? 
400 वर्ष जगणारा मासा, 150 वर्षानंतर देतो पिलांना जन्म, तब्बल 10 वर्ष पिलांना वाढवतो पोटात, नेमका कुठे आढळतो हा मासा? 
Nobel Prize Chemistry 2026 : रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget