Viral news : न्यूझीलंडच्या महिला खासदारानं प्रसूती वेदनेसह सायकल चालवत गाठलं रुग्णालय
न्यूझीलंडच्या महिला खासदार ज्युली अॅनी जेंटर यांनी प्रसूती वेदनेसह सायकल चालवत रुग्णालय गाठलं. पर्यावरणासाठी केलेल्या वेगवेगळ्या अभियानामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.
![Viral news : न्यूझीलंडच्या महिला खासदारानं प्रसूती वेदनेसह सायकल चालवत गाठलं रुग्णालय The New Zealand MP Julie Anne Genter MP reached the hospital cycling with labor pain Viral news : न्यूझीलंडच्या महिला खासदारानं प्रसूती वेदनेसह सायकल चालवत गाठलं रुग्णालय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/28/f0c6d3333de2b54ef7aa189daca7dde8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
न्यूझीलंडच्या महिला खासदार ज्युली अॅनी जेंटर यांनी प्रसूती वेदनेसह सायकल चालवत रुग्णालय गाठलं. पर्यावरणासाठी केलेल्या वेगवेगळ्या अभियानामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. जूली यांना रविवार पहाटे प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतर त्यांनी स्वत: सायकल चालवत रुग्णालय गाठलं. रुग्णालयात पोहोचण्याच्या एका तासानंतर त्यांनी बाळाला जन्म दिला. त्यांनी याबाबतची माहिती फेसबूक अकाऊंटवर शेअर केली आहे.
कोण आहेत ज्युली अॅनी जेंटर?
ज्युली अॅनी जेंटर 'हरित खासदार' म्हणजेच 'ग्रीन एमपी' (Green MP) या नावानंही प्रसिद्ध आहेत. जूली नेहमी त्यांच्या पर्यावरणासंबंधित विविध अभियानांमुळे चर्चेत असतात. जूली यांच्याकडे अमेरिका आणि न्यूझीलंड या दोन्ही देशाचं नागरिकत्व आहे. त्यांचा जन्म मीनसोटा येथा झाला. त्यानंतर त्या न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाल्या. न्यूझीलंडमधील मीडिया रिपोर्टनुसार, जूली यांनी 2018सालीही अशाच प्रकारे सायकल चालवत रुग्णालय गाठत बाळाला जन्म दिला होता.
न्यूझीलंड नेहमीच भूमीशी नाळ असणाऱ्या नेत्यांमुळे चर्चेत असतं
50 लाख लोकसंख्या असलेला न्यूझीलंड नेहमीच भूमीशी नाळ असणाऱ्या नेत्यांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा केट लॉरेल आर्डर्न (Jacinda Kate Laurell Ardern) यांनी त्यांच्या तीन महिन्यांच्या चिमुकलीसह संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांनी चिमुकलीला दिलं. यावेळी त्या प्रकाशझोतात होत्या.
हे ही वाचा :
-
Kim Jong Un : उत्तर कोरियामध्ये लेदर जॅकेट घालण्यावर बंदी, किम जोंग उनची नक्कल कराल तर...
-
Sweden First Female PM : स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचा नियुक्तीनंतर काही तासांनी राजीनामा, नक्की काय घडलं?
-
New Corona Variant Omicron: ओमिक्रॉनचा धसका! अनेक देशांमध्ये पुन्हा कठोर निर्बंध लागू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)