एक्स्प्लोर

Kim Jong Un : उत्तर कोरियामध्ये लेदर जॅकेट घालण्यावर बंदी, किम जोंग उनची नक्कल कराल तर...

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांनं देशात लेदर जॅकेट घालण्यावर बंदी घातली आहे. लेदर जॅकेट विकणाऱ्या दुकानांवरही बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांनं देशात लेदर जॅकेट घालण्यावर बंदी घातली आहे. लेदर जॅकेट विकणाऱ्या दुकानांवरही बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी देशात फॅशन पोलिसांची तुकडीही तैनात करण्यात आली आहेत. 

उत्तर कोरिया (South Korea) चा हुकूमशहा किम जोंग उन विचित्र निर्णयांमुळे कायमच चर्चेत असतो. किम जोंग उन यानं आपल्या देशातील लोकांसाठी एक नवा विचित्र नियम लागू केला आहे. हुकूमशहा किम जोंग उन त्याच्या आवडत्या लेदर कोटची कॉपी केल्यामुळे चांगलाच संतापला आहे. आता त्यानं देशात लेदर कोटच्या विक्रीवर आणि परिधान करण्यावरच बंदी घातली आहे. या नियमानंतर उत्तर कोरियामध्ये कोणालाही लेदर कोट विकता किंवा घालता येणार नाही.

एका रिपोर्टनुसार, किमने 2019 मध्ये पहिल्यांदा लेदर कोट घातला होता, त्यानंतर या कोटला देशभर पसंती मिळू लागली. यादरम्यान  उत्तर कोरियाच्या आण्विक साठ्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा सुरु होती. किमच्या या लूकची दक्षिण कोरियाच्या मीडियामध्ये खूप चर्चा झाली. सुरुवातीला प्रत्येक वर्गातील लोकांना हे जॅकेट परवडणारे नव्हतं, त्यामुळे फक्त श्रीमंत वर्गातील लोकच लेदर जॅकेट घालायचे. पण हळूहळू स्वस्त दर्जाची लेदर जॅकेट लोकप्रिय होऊ लागली आणि आता प्रत्येक वर्गातील लोक ते घालू लागले. त्यामुळे किमने लेदर जॅकेटवरच बंदी आणली आहे.

नव्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी देशात अनेक फॅशन पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. लेदर जॅकेट विक्री करणारी दुकाने बंद करण्याचे आदेश या फॅशन पोलिसांना देण्यात आले आहेत. असं म्हटलं जातंय की, किम जोंग उन यांना भीती वाटते की, देशातील सर्व जनता त्यांच्यासारखा पोशाख घालून त्यांचं वर्चस्व आणि अधिकार कमी करत आहे.

लोकांना लेदर कोट न घालण्याच्या सूचना
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरियातील पोलिसांनी लेदर कोट न घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. लेदर जॅकेटचे व्यापारी आणि दुकानदार सांगतात की, चीन आणि उत्तर कोरियामध्ये व्यापार सुरू झाल्यानंतरच कमी दर्जाचे आणि स्वस्त लेदर कोट येऊ लागले. लोकांनीही या कोटला चांगली पसंती दाखवली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वस्त चामड्याची ऑर्डर देण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा :

एक व्यथा अशीही... तब्बल 43 वर्षे तुरुंगात काढल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता!
Pakistan Financial Crisis : पाकिस्तानच्या डोक्यावर कर्जाचा वाढता डोंगर, कर्जाचा आकडा पोहोचला 50 लाख कोटींच्या पार

महिला कलाकार असलेल्या कार्यक्रमावर बंदी, महिला पत्रकारांनीही हिजाब परिधान करणं बंधनकारक; तालिबान सरकारचे आदेश

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Embed widget