एक्स्प्लोर
Advertisement
काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात 15 कॅडेट्सचा जागीच मृत्यू, तर 4 जण जखमी झाले आहेत.
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात 15 कॅडेट्सचा जागीच मृत्यू, तर 4 जण जखमी झाले आहेत.
काबुलमधील पीडी 5 येथील मार्शल फहीम मिलिट्री अकॅडमीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाला. स्फोटात युनिव्हर्सिटीच्या गेटजवळील बसला टार्गेट करण्यात आलं होतं.
मिलिट्रीचे प्रवक्ते दौलत वजीरी यांनी हल्ल्यात 15 कॅडेटचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासातील काबुलमधील हा दुसरा आत्मघातकी हल्ला होता. तर मंगळवारपासून अफगाणिस्तानमध्ये एकूण 7 मोठे हल्ले झाले. यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 200 पेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. तर 100 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी काबुलमधील एका मशिदीत आत्मघातकी हल्लेखोरानं स्वत: ला उडवून दिलं. यात 56 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 55 जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेनं घेतली.
तर आज मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही घेतली नाही. पण हा हल्ला तालिबान्यांनी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
Advertisement