Stefania Maracineanu : कोण आहेत स्टेफानिया मोरेचिनानु? ज्यांना गुगलने डुडलद्वारे दिली श्रद्धांजली
Stefania Maracineanu : आज स्टेफानिया मोरेचिनानुचा 140 वा वाढदिवस आहे. या प्रसंगी गुगुलने डूडलच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करून त्यांचे डूडल तयार केले आहे.
Stefania Maracineanu 140th Birth Anniversary : आज स्टेफानिया मोरेचिनानुचा (Stefania Maracineanu) 140 वा वाढदिवस (Stefania Maracineanu 140th Birth Anniversary) आहे. या प्रसंगी गुगलने डूडलच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करून त्यांचे डूडल तयार केले आहे. स्टेफानिया मोरेचिनानु त्यांच्या शोधासाठी ओळखल्या जातात. रेडिओ अॅक्टिव्हिटी शोधून त्यावर संशोधन करणाऱ्या महिलांपैकी त्या एक होत्या. त्यांच्याचविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
कोण आहेत स्टेफानिया मोरेचिनानु?
स्टेफानिया मोरेचिनानु यांचा जन्म 18 जून 1882 रोजी बुखारेस्ट येथे झाला. त्यांचे दहावीचे शिक्षण सेंट्रल स्कूल गर्ल्समध्ये झाले. 10 वी शिकत असताना त्यांना रोमानियाच्या विज्ञान मंत्रालयाकडून शिष्यवृत्ती मिळाली आणि नंतर रेडियम संस्थेकडून पदवी संशोधन करण्यासाठी पॅरिसला गेल्या. त्यांनी बुखारोस्ट विद्यापीठातही प्रवेश घेतला. यानंतर, मॉरिसिनानु सॉर्बोन येथे रेडिओ एक्टिव्हिटीचा अभ्यासक्रम घेतला आणि 1926 पर्यंत त्यांनी रेडियम इन्स्टिट्यूटमध्ये मेरी क्युरी यांच्यासोबत संशोधन केले. पोलोनियमच्या संशोधनावर त्यांनी आपले अर्धे आयुष्य घालवले होते.
त्यांच्या संशोधना दरम्यान, स्टेफानिया मोरेचिनानु यांनी कृत्रिम पावसावर संशोधन करण्यासाठी बराच वेळ घालवला. त्यासाठी त्या अल्जेरियाला गेल्या. स्टेफानिया यांनी भूकंप आणि पाऊस यांच्यातील संबंधाचा खूप बारकाईने अभ्यास केला होता. इतकेच नाही तर, भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या भूकंपामुळे रेडिओ एक्टिव्हिटी वाढते हे शोधणाऱ्या त्या पहिला महिला ठरल्या. 1936 मध्ये स्टेफानिया यांना त्यांच्या कामासाठी रोमानियन अकादमी ऑफ सायन्सेसने मान्यता दिली.
महत्वाच्या बातम्या :
- International Yoga Day 2022 : योग म्हणजे काय? जाणून घ्या योगाचे फायदे आणि प्रकार
- Yoga Day 2022 : सतत चिडचिड होते? हे योगासनं करा अन् रागावर नियंत्रण मिळवा
- International Yoga Day 2022 : 'जागतिक योग दिना'निमित्त स्वत:ला करा मानसिकदृष्ट्या तयार; वाचा योगाचे 10 फायदे
- 18th June 2022 Important Events : 18 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना