Sri Lanka Crisis: श्रीलंकेत पुन्हा मोठा गोंधळ, अंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेरलं; राष्ट्रपती राजपक्षेंचं पलायन
Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेत वाढत्या महागाईनं त्रस्त झालेले नागरिक आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालंय. दरम्यान, आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला.
Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेत वाढत्या महागाईनं त्रस्त झालेले नागरिक आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालंय. दरम्यान, आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. त्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पळ काढलाय. आंदोलकांनी संसद रजिता सोनारत्नेच्या घरावरही हल्ला केल्याची माहिती समोर आलीय. याआधी 11 मे रोजी तत्क प्रधानमंत्री महिंदा राजपक्ष यांनी त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत पळ काढला होता. त्यावेळी जनतेनं कोलंबोमध्ये राजपक्षेच्या शासकीय घराला घेराव घातला होता.
श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघेनं सध्याच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षातील नेत्यांची तात्काळ बैठक बोलावली आहे. प्रधानमंत्री विक्रमसिंघेनं संसद सत्र बोलवण्याचं आवाहन केलं. श्रीलंका पोदुजाना पेरामुना म्हणजेच एसएलपीपीच्या 16 संसद सदस्यांनी पत्राद्वारे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेला राजीनामा देण्यांची विनंती केली आहे.
आंदोलकांकडून राष्ट्रपती भवनावर तोडफोड
आंदोलकांनी आज दुपारी राष्ट्रपती भवनाला घेरलं होतं. त्यानंतर राजपक्षेच्या शासकीय घरावर तोडफोड केली. श्रीलंकेतील वाढत्या महागाईमुळं राष्ट्रपती गोटाबया राजपक्षेच्या राजीनाम्यासाठी देशातील विविध ठिकाणी सरकारविरुद्ध रॅली काढण्यात आली आहे.
आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झटापट
कोलंबोमध्ये निदर्शनांदरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झटापट झाली आहे. पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामना सुरू असलेल्या गाले क्रिकेट स्टेडियमवरही गदारोळ झाल्याचं वृत्त आहे. आंदोलकही येथे पोहोचले. शनिवारी मोठ्या संख्येनं आंदोलक गॅलेमध्ये दाखल झाले आणि स्टेडियमच्या बाहेर आणि आत पोस्टर फडकावत महागाईविरुद्ध आवाज उठवत निदर्शने केली.
हे देखील वाचा-
- Twitter Deal : एलॉन मस्क यांचा ट्विटर खरेदीचा करार रद्द, 44 अब्ज डॉलरची डील संपली, कंपनीवर केले 'हे' आरोप
- Japan Gun Laws : जगातील सर्वात सुरक्षित देश आहे जपान, 'बंदूक वापरण्यासाठी कडक कायदे, तरीही माजी पंतप्रधानांची हत्या
- UK New Prime Minister : भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी दावेदारी