एक्स्प्लोर

UK New Prime Minister : भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी दावेदारी 

UK New Prime Minister : भारतीय वंशाचे ऋषि सुनक ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पाहिली होती.

UK New Prime Minister : भारतीय वंशाचे ऋषि सुनक (Rishi Sunak) ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून लवकरच शपथ घेणार आहेत.  त्यांनी दावेदारी दाखल केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत सुनक यांनी माहिती दिली आहे. सुनक यांनी बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पाहिली होती. बोरिस जॉन्सन यांच्यावर आरोप झाले होते, त्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ऋषि सुनक यांच्याकडे पंतप्रधानपद येणार आहे. इंग्लंडसारख्या मोठ्या देशाचे पंतप्रधान झाल्यास ही भारतासाठी नक्कीच गौरवाची गौष्ट असेल. 

कोण आहेत ऋषि सुनक?
ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. पण त्याचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतीन ब्रिटनमध्ये आले होते. त्यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठातीन एमएचं शिक्षण घेतलं. ऋषी सुनक इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे. 2015 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. ऋषी सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या चांगलं काम केलं आहे. कोरोनाच्या काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सर्व विभागांना खूश करण्यात ऋषी सुनक यशस्वी ठरल्याने त्याचे कौतुकही होत झाले. अनेक प्रसंगी, ऋषी यांनी बोरिसऐवजी टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये भाग घेतला.

 

महाराष्ट्राप्रमाणेचं ब्रिटनमध्येही बंड –
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारमध्ये जसं बंड झालं तसाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्येही घडला. जॉन्सन सरकारमधील जवळ जवळ 50 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. बोरिस जॉन्सन यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मंत्र्यांनी राजीनामे दिले होते.

बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा - 
ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी मंगळवारी राजीनामा दिला. दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर खुर्ची सोडण्याचा दबाव वाढला आणि त्यानंतर जॉन्सन यांनी अखेर गुरुवारी राजीनामा दिला.

बोरिस जॉन्सन याना का द्यावा लागला राजीनामा?

जूनमध्ये बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात पक्षांतर्गत अविश्वास प्रस्ताव आणला. त्यात 59 टक्के मतं मिळवून जॉन्सन यांनी खुर्ची वाचवली. पक्षाच्या घटनेप्रमाणे एकदा अविश्वास प्रस्ताव जिंकल्यानंतर पुढचं एक वर्ष अशा नेत्याविरोधात पुन्हा अविश्वास ठराव आणता येत नाही. त्यामुळे ते पंतप्रधानपदी कायम राहतील असं वाटत होतं. पण मंत्र्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. आणि बोरिस संकटात आले. बुधवार सायंकाळपर्यंत कॅबिनेटमधील 17 मंत्री, 12 संसदीय सचिव, परदेशात नियुक्त सरकारच्या चार प्रतिनिधींनी राजीनामा दिला. यामागची महत्त्वाची कारणं आहेत. कोरोना काळात पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेली ख्रिसमस पार्टी आणि त्याची झालेली पोलीस चौकशी. वाढते कर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीविषयी सरकारच्या धोरणांवर पक्षातूनच होत असलेला विरोध आणि मागच्या महिन्यात झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्येही कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला पराभव पत्करावा लागला.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan Attacked

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Embed widget