(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Spain : स्पेनचा महिलांसाठी मोठा निर्णय, मासिक पाळीच्या काळात मिळणार हक्काची सुट्टी
Menstrual leave : स्पेनच्या (Spain) संसदेने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता स्पेनमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी (Menstruation leave) घेता येणार आहे.
Menstrual leave : स्पेनच्या (Spain) संसदेने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता स्पेनमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी (Menstruation leave) घेता येणार आहे. या या काळात महिलांना पगारी रजा (leave) मंजूर करण्यात येणार आहे. असा निर्णय घेणारा स्पेन हा पहिला युरोपियन (Europe) देश ठरला आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देणाऱ्या काही देशांपैकी आता स्पेन हा एक बनला आहे.
जपान, इंडोनेशिया आणि झांबिया या देशामध्ये देखील महिलांना सुट्टी
स्पेनमध्ये करण्यात आलेल्या या कायद्याला संसदेत एकूण 185 मतांपैकी 154 मते मिळाली आहेत. बहुमतानं हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती सरकारनं केली आहे. सध्या काही निवडक देशांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी दिली जाते. सुट्टी देणाऱ्या देशांमध्ये जपान, इंडोनेशिया आणि झांबिया या देशांचा समावेश आहे.
Minister Irene Montero : स्त्रियांच्या आरोग्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णय
स्त्रियांच्या आरोग्यांच्या दृष्टीनं हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचे मंत्री इरेन मोंटेरो (Minister Irene Montero) यांनी म्हटलं आहे. या कायद्यानं महिलांना मासिक पाळीत पगारी रजा देण्याचा अधिकार दिला असल्याचे मंत्री इरेन मोंटेरो यांनी म्हटलं आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना आजारी रजा (Sick leave) लागू करण्याचा अधिकार असणार आहे.
UGT कामगार संघटनेचा विरोध
स्पॅनिश सोसायटी ऑफ गायनॅकॉलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्सच्या (panish Society of Obstetrics and Gynecology) मते, मासिक पाळीमध्ये सुमारे एक तृतीयांश महिलांना तीव्र वेदना होतात. दरम्यान, मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्याच्या निर्णयाला काही संघटनांनी विरोध देखील केला आहे. UGT (Unión General de Trabajadores ) या स्पेनच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेनं या कायद्याला विरोध केला आहे. हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांना कलंकित करू शकतो असं या संघटनेनं म्हटलं आहे.
मासिक पाळीदरम्यान (Menstruation) महिन्याच्या त्या चार पाच दिवसांमध्ये महिलांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. अनेकदा या वेदनांमुळे त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो. मासिक पाळीतील होणाऱ्या वेदनांमुळे महिलांना मासिक पाळीची सुट्टी देण्याचा निर्णय स्पेनने घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: