Trending News : '9 की 8' ; व्हिडीओमध्ये झाकणं किती? नेटकरीही चक्रावले
मॉडर्न सेन्स शॉप या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
Trending : सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक ट्रिक व्हिडीओची चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमधील ट्रिक सोडवण्याचा प्रयत्न अनेक नेटकरी करत आहेत. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला नऊ झाकणं दिसत आहेत. त्यानंतर ही झाकणं आठ होतात. व्हिडीओमधील एक झाकणं कुठे गायब होतं याचा विचार अनेक नेटकऱ्यांनी केला. अनेका जण हे एक झाकणं शोधू शकले नाहित.
मॉडर्न सेन्स शॉप या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 2,044,069 पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की टेबलवर नऊ झाकणं आहेत. त्यानंतर एक व्यक्ती एका स्टिकनं ही झाकणं दोन रांगेत ठेवतो. त्यानंतर ही झाकणं आठ होतात. खरतंर हा व्हिडीओ तयार करणारा व्यक्ती जेव्हा एका रांगेत ती झाकणं ठेवतो. तेव्हा तो त्या स्टिकचा वापर करून एका झाकणं दुसऱ्या झाकण्याच्या वर ठेवतो. त्यामुळे ते कव्हर झालेले झाकण कोणालाही दिसत नाही.
View this post on Instagram
काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करून नऊ झाकणं आहेत की आठ हे ओळखण्याचा प्रयत्न केला. पण काहींनी मात्र हा व्हिडीओ एडिटेड आहे,अशा कमेंट्स केल्या.
महत्वाच्या बातम्या :
Russia Ukraine War Memes : रशियाचा युक्रेनवर हल्ला; सोशल मीडियावर मिम्सची लाट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha