(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War Memes : रशियाचा युक्रेनवर हल्ला; सोशल मीडियावर मिम्सची लाट
Russia Ukraine War Memes : काही यूझर्सनं सोशल मीडियावर मिम्स शेअर करून त्यांची मतं भन्नाट पद्धतीनं मांडली आहेत.
Russia Ukraine War Memes : युक्रेनविरोधात (Ukraine) लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा रशियाचे (russia) राष्ट्रपती पुतीन यांनी केल्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनमधील डोन्बास प्रांतावर हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये ही स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार, क्रमाटोस्कमध्ये दोन स्फोट झाले आहेत. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत.
नोव्हेंबरपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. आता रशिया-युक्रेन सीमेवर युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. पण दुसरीकडे मात्र या सर्व गोष्टींवर नेटकरी मिम्स तयार करताना दिसत आहेत. काही यूझर्सनं सोशल मीडियावर मिम्स शेअर करून त्यांची मतं भन्नाट पद्धतीनं मांडली आहेत.
एका यूझरनं ट्वीटरवर एक भन्नाट मिम शेअर केलं आहे. या मिममध्ये दिसत आहे की जगामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींमुळे डोकेदुखी निर्माण होते पण सगळ्यात जास्त डोकेदुखी ही रशियाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना होत आहे. या ट्वीटला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
— Ukraine / Україна (@Ukraine) December 7, 2021
स्कॅम 1992 या सीरिजमधील, 'चलिए मान लिया हम अच्छे नही, पर आप तो अच्छे है ना!' या डायलॉगचे मिम एका नेटकऱ्यानं शेअर केलं आहे. या मिममध्ये लिहिले आहे, 'युक्रेन रशियाला म्हणत आहे की...'
Nobody:
— Pradeep Bajpai (@Pradeep_NF) February 15, 2022
Ukraine to Russia#Ukraine #MEMES pic.twitter.com/aKA9SJSEFC
रशियानं युक्रेवर केलेल्या हल्ल्याचा शेअर मार्केटवर परिणाम झाला. त्याच संदर्भात 'गोलमाल' या चित्रपटातील एक डायलॉगचे मिम देखील व्हायरल होत आहे. 'जल्दी कर मार्केट की वाट लग रही है', असं लिहिलेलं दिसत आहे.
#RussiaUkraine #RussiaUkraineCrisis#RussiaInvadedUkraine #StockMarketindia #stockmarketcrash #MEMES#Nifty
— Fingrow7 (@fingrow7) February 21, 2022
Traders/Investors to putin pic.twitter.com/MXnhcVCHYY
'निर्लज्ज है तु', असं लिहिलेलं मिम देखील व्हायरल होत आहे.
Ukraine to Russia 👇😭🤣#MEMES #RussiaUkraineConflict pic.twitter.com/siGWAP16s7
— Shaina Gulati (@shainagbedi) February 22, 2022
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
- Russia Ukraine War : रशियाचे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश, भारताचं संयुक्त राष्ट्रात शांततेचं आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha