एक्स्प्लोर
Advertisement
पुलवामा हल्ल्यानंतर बंद केलेली समझौता एक्सप्रेस आजपासून पुन्हा सुरु
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान धावणारी समझौता एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती.
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान धावणारी समझौता एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. ही समझौता एक्स्प्रेस आजपासून पुन्हा धावणार आहे. आज रात्री 11.10 वाजता समझौता एक्सप्रेस दिल्लीहून लाहोरसाठी निघणार आहे.
नुकतीच समझौता एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील रेल्वे विभागांनी समझौता एक्सप्रेसच्या फेऱ्या पूर्ववत करण्यासाठी अनुकूल पावले उचलली आहेत. समझौता एक्सप्रेस आज लाहोरला गेल्यानंतर उद्या पुन्हा लाहोरवरुन दिल्लीसाठी रवाना होईल.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय हवाई दलाने बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर बॉम्बफेक केली. यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 350 दहशतवादी ठार केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement