Russia Ukraine Crisis : युक्रेन युरोपियन संघात सामील होण्यासाठी अर्ज, सदस्यत्वाची प्रक्रिया इतकी सोपी आहे का? जाणून घ्या
Russia-Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी युरोपियन संघाचा (EU) सदस्य होण्यासाठी अर्जावर स्वाक्षरी केली आहे.
Russia Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी युरोपियन संघाचा (EU) सदस्य होण्यासाठी अर्जावर स्वाक्षरी केली. त्यांनी EU ला युक्रेनला लवकरात लवकर सदस्य म्हणून स्वीकारण्यास सांगितले आहे. पण युरोपियन संघाचे सदस्य बनण्याची प्रक्रिया काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, ते जाऊन घ्या.
1. जर एखाद्या देशाला युरोपियन संघाचा सदस्य व्हायचे असेल तर त्याला मुक्त बाजार अर्थव्यवस्था निर्माण करणे, EU कायदे आणि युरो चलन स्वीकारणे यासारखे काही निकष पूर्ण करावे लागतील. यानंतर एक दीर्घ प्रक्रिया चालते. युरोपियन संघाचा सर्वात नवीन सदस्य असलेल्या क्रोएशियाला सामील होण्यासाठी 10 वर्षे लागली.
2. सर्व देशांना युक्रेनच्या युरोपियन संघात सामील होण्यास मान्यता द्यावी लागेल, जे लवकरच शक्य होणार नाही कारण युरोपियन संघाचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांनी युरोन्यूजला सांगितले की, युक्रेनच्या सदस्यत्वाबाबत इतर सदस्यांमध्ये भिन्न मते आणि संवेदनशीलता आहेत.
3. स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया आणि झेक प्रजासत्ताकच्या नेत्यांनी युरोपियन संघाला एक नवीन मार्ग तयार करण्यास सांगितले आहे. जेणेकरून युक्रेनला लवकरच युरोपियन संघाचा सदस्य बनवता येईल. मात्र युरोपियन संघाचे नेते या मुद्द्यावर अद्याप एकत्र आलेले नाहीत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन म्हणाल्या, 'आम्हाला युक्रेन युरोपियन संघामध्ये असावे असे वाटते, परंतु सदस्यत्वाच्या प्रक्रियेस वेळ लागेल.'
4. युरोपियन संघामध्ये सामील झाल्यामुळे युक्रेनच्या सैन्याला ताबडतोब मदत होईल कारण युरोपियन संघाचे सदस्य देश संरक्षण नियमाने बांधील आहेत, ज्यामध्ये जर एखाद्या देशाने कोणत्याही युरोपियन संघातील सदस्य देशावर हल्ला केला तर बाकीच्यांना त्याला मदत करावी लागेल.
5. युरोपियन संघामध्ये आल्याने युक्रेनलाही आर्थिक फायदा होईल कारण यामुळे युक्रेनचे नागरिक युरोपियन संघामध्ये कुठेही येऊ शकतात आणि त्यांना युरोपियन संघाच्या सदस्यांना उपलब्ध असलेले सर्व अधिकार मिळतील असे अतिरिक्त फायदे मिळतील.
6. युरोपियन संघाने युक्रेनचा अर्ज स्वीकारला तरीही ते युक्रेनसाठी फायदेशीर ठरेल. युरोपियन कौन्सिल 10 आणि 11 मार्च रोजी एक शिखर परिषद आयोजित करेल, ज्यामध्ये युक्रेनच्या सदस्यत्वावर चर्चा केली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर
- Russia Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha