USA on Russia Ukraine War : भारत-रशिया संबंधांवर अमेरिकेचे मोठे वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष जो बायडन?
USA on Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भारत-अमेरिका संबंधावर काय परिणाम होणार का? यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
USA on Russia Ukraine War : गेल्या तीन दिवसांपासून रशिया आणि युक्रेनध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा जगभरातील अनेक देशांवरही परिणाम होत आहे. भारताचे रशिया आणि अमेरिकेसोबतही संबंध चांगले आहेत. परंतु, या युद्धाचा भारत-अमेरिका संबंधावर काय परिणाम होणार का? यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जो बायडन यांनी म्हटलं आहे की, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध वेगळे आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. रशियासोबत संबंध असलेल्या प्रत्येक देशाला नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आपला प्रभाव वापरण्याचा सल्ला जो बायडन यांनी दिला आहे. याबरोबरच भारतासोबत अमेरिकेचे हित आणि मूल्ये निगडित आहेत, असे बायडन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस याबाबत बोलताना म्हणाले की, अमेरिकेचे भारताशी महत्त्वाचे हितसंबंध आणि मूल्ये जोडलेली आहेत. आम्ही भारतासोबत महत्त्वाच्या मूल्यांची देवाण-घेवाण करतो. आम्हाला माहित आहे की, भारताचे रशियाशी चांगले संबंध आहेत. परंतु, हे संबंध रशिया आणि अमेरिकेमधील संबंधांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे भारत-रशिया संबंधामुळे भारत-अमेरिका संबंधावर कोणताही परिणाम होणार नाही.
नेड प्राइस म्हणाले, "भारताचे रशियाशी मजबूत संबंध आहेत. परंतु, या दोन्ही देशांसारखे रशिया-अमेरिकेचे संबंध नाहीत. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. अमेरिकेची भारतासोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे."
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियन सैन्याने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आहे. आजही तिसऱ्या दिवशी दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. तर अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. शिवाय अमेरिकेने रशियावर या निर्णयावरून टीकाही केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine Conflict : एअर इंडियाचे विमान बुखारेस्टमध्ये पोहोचले, युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतणार
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine Crisis : 1200 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांची माहिती
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल