एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?

Uddhav Thackeray camp Vs Eknath Shinde camp: यंदाची विधानसभा निवडणूक खरी शिवसेना कोणाची, याचा निकाल देणार आहे. ठाकरे आणि शिंदेचे 51 मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक परिस्थिती ढवळून काढणाऱ्या आणि सामान्य नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदु ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन राज्यातील 288 मतदारसंघातील कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगली होती.  मात्र, मुख्य लक्ष शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या दोन गटांमध्ये कोणाची सरशी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला (Shinde Camp) बहाल केले होते. मात्र, तरीही खरी शिवसेना आमचीच ही गोष्ट नागरिकांच्या मनावर बिंबवण्यात शिंदे गट पूर्णपणे यशस्वी ठरला नव्हता. उद्धव ठाकरे यांनीही, 'खरी शिवसेना आमचीच, दुसरा शिवसेना पक्ष असूच शकत नाही', असे वारंवार सांगितले होते. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचा फैसला करण्यासाठी विधानसभेची आमनेसामने होणारी लढाई ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 51 मतदारसंघात ठाकरे गट (Thackeray Camp) आणि शिंदे गटाचे उमेदवार परस्परांसमोर उभे ठाकले होते. यामध्ये मुंबई महानगर परिसरातील 19, मराठवाडा आणि कोकणातील 8, विदर्भातील 6, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी 4 जागांचा समावेश होता.  आगामी मुंबई महानगरपालिकेच्यादृष्टीने शिंदे गट आणि ठाकरे गटात थेट लढत होणाऱ्या मुंबईतील 12 जागांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

क्र. मतदारसंघ शिवसेना (शिंदे) शिवसेना (ठाकरे)
1 मागाठाणे प्रकाश सुर्वे उदेश पाटेकर
2 भांडुप पश्चिम अशोक पाटील रमेश कोरगावकर
3 जोगेश्वरी पूर्व मनीषा वायकर अनंत नर
4 दिंडोशी संजय निरुपम सुनील प्रभू
5 चेंबूर तुकाराम काते प्रकाश फातर्पेकर
6 माहीम सदा सरवणकर महेश सावंत
7 भायखळा यामिनी जाधव मनोज जामसुतकर
8 वरळी मिलिंद देवरा आदित्य ठाकरे
9 विक्रोळी सुवर्णा कारंजे सुनील राऊत
10 कुर्ला मंगेश कुडाळकर प्रविणा मोरजकर
11 अंधेरी पूर्व मुरजी पटेल ऋतुजा लटके
12 कुडाळ निलेश राणे वैभव नाईक
13 रत्नागिरी उदय सामंत बाळा माने
14 राजापूर किरण सामंत राजन साळवी
15 सावंतवाडी दीपक केसरकर राजन तेली
16 महाड भरत गोगावले स्नेहल जगताप
17 दापोली योगेश कदम संजय कदम
18 गुहागर राजेश बेंडल भास्कर जाधव
19 कर्जत महेंद्र थोरवे नितीन सावंत
20 पालघर राजेंद्र गावित जयेंद्र दुबळा
21 अंबरनाथ बालाजी किणीकर राजेश वानखेडे
22 बोईसर विलास तरे विश्वास वळवी
23 भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे महादेव घाटाळ
24 कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर सचिन बासरे
25 कल्याण ग्रामीण राजेश मोरे सुभाष भोईर
26 ओवळा माजिवडा प्रताप सरनाईक नरेश मनेरा
27 कोपरी पाचपाखाडी एकनाथ शिंदे केदार दिघे
28 छत्रपती संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट राजू शिंदे
29 छत्रपती संभाजीनगर मध्य प्रदीप जैस्वाल बाळासाहेब थोरात
30 परभणी आनंद भरोसे राहुल पाटील
31 सिल्लोड अब्दुल सत्तार सुरेश बनकर
32 पैठण विलास भुमरे दत्ता गोर्डे
33 कन्नड संजना जाधव उदयसिंह राजपूत
34 वैजापूर रमेश बोरनारे दिनेश परदेशी
35 धाराशिव अजित पिंगळे कैलास पाटील
36 उमरगा ज्ञानराज चौगुले प्रवीण स्वामी
37 कळमनुरी संतोष बांगर संतोष टारफे
38 चोपडा चंद्रकांत सोनवणे प्रभाकर सोनवणे
39 नांदगाव सुहास कांदे गणेश धात्रक पाचोरा
40 मालेगाव बाह्य दादा भुसे अद्वय हिरे
41 बार्शी राजेंद्र राऊत दिलीप सोपल
42 सांगोला शहाजी पाटील दीपक साळुंखे
43 राधानगरी प्रकाश आबिटकर के.पी पाटील पाटण
44 नेवासा विठ्ठलराव लंघे शंकरराव गडाख
45 बुलढाणा संजय गायकवाड जयश्री शेळके
46 मेहकर संजय रायमूलकर सिद्धार्थ खरात
47 बाळापूर बळीराम शिरसकर नितीन देशमुख
48 रामटेक आशीष जैस्वाल विशाल बरबटे
49 दर्यापूर अभिजीत अडसूळ गजानन लवटे
50 पाटण शंभूराज देसाई हर्षद कदम
51 पाचोरा किशोर पाटील वैशाली सूर्यवंशी

Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget