(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : 1000 पेक्षा जास्त रशियन सैनिक मारले; युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा
Russia Ukraine War : युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, आतापर्यंत 1000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. या दोन दिवसांत युक्रेनने रशियाचे एक हजार पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत 1000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. याबरोबरच एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने दावा केला आहे की त्यांनी मुख्य विमानतळावर ताबा मिळवला आहे. शिवाय युक्रेनची राजधानी कीवचा पश्चिमेकडून संपर्क तुटला आहे.
युक्रेनच्या अनेक शहरात रशियाचे सैनिक आधुनिक शस्त्रे, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. या हल्ल्यात युक्रेनचे अनेक सैनिक आणि नागिरकही मारले गेले आहेत. दुसरीकडे युक्रेनने दावा केला आहे की, युक्रेनच्या सैन्याने रशियाचे लढाऊ विमान नष्ट केले आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये आतापर्यंत 137 पेक्षा जास्त लोक मरण पावल्याची माहिती मिळत आहे. रशियन सैनिक युक्रेनमधील लष्करी तळांना आणि नागरिकांना लक्ष्य करत आहेत.
युद्धाच्या दुसऱ्या दिवशीच युक्रेनची परिस्थिती बिकट झाली आहे. रशियाची वृत्तसंस्था ताशने दिलेल्या माहितीनुसार,
युक्रेनने रशियाला चर्चेचा प्रस्ताव पाठवला आहे. या शिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की भूमिगत झाले आहेत. दुसरीकडे चीनने दावा केला आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. पुतिन म्हणाले की, ते युक्रेनसोबत उच्चस्तरीय चर्चेसाठी तयार आहेत. याआधी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतीन यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता, त्यावर त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे.
रशियाचे राष्ट्राअध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर गुरूवारी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. अनेक बाजूंनी रशियाने युक्रेनला घेरले आहे. रशियाकडून युक्रेनची राजधानी कीवला लक्ष्य करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, युक्रेनशी चर्चेला तयार, पण...
- Russia Ukraine War: युक्रेनने शस्त्र खाली टाकल्यास चर्चेस तयार; रशियाची भूमिका
- Russia Ukraine War : रशियाने ब्रिटनशी घेतला बदला, सर्व ब्रिटीश विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले
- Russia-Ukraine Conflict : भारत सरकारचं मिशन एअरलिफ्ट, AIR INDIA चे दोन विशेष विमान तयार ठेवण्याचे आदेश