Russia-Ukraine War : ओख्तिर्कामध्ये लष्करी तळावर मोठा हल्ला, 70 हून अधिक युक्रेनियन सैनिक ठार
रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia) सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांचे सैनिक (Ukraine) आणि सामान्य नागरिक सातत्याने मारले जात आहेत
Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia) सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांचे सैनिक (Ukraine) आणि सामान्य नागरिक सातत्याने मारले जात आहेत. युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियाच्या ताज्या हल्ल्यात 70 हून अधिक युक्रेनियन सैनिक (ukraine army) ठार झाल्याची माहिती आहे. युक्रेनच्या लष्करी तळावर रशियन तोफखान्याने हल्ला केला, ज्यामध्ये मोठ्या संख्येने सैनिक मरण पावले. ओख्तिर्कामध्ये हा हल्ला झाला. हे शहर खार्किव आणि कीव दरम्यान वसलेले आहे. Okhtirka गव्हर्नर Zhivitsky यांनी सोळल मिडियावर या हल्ल्याची माहिती दिली आहे.
The governor of the Sumy region, Dmitry Zhivitsky, published a photo of the consequences of artillery shelling in the district town of Akhtyrka. According to him, about 70 Ukr soldiers were dead pic.twitter.com/z9gX7JpOL3
— 0SINTT (@0sintt) March 1, 2022
भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
युक्रेनमधील खारकिव्हमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. नवीन शेखराप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. खारकिव्हच्या प्रशासनाने या आधीच सांगितलं होतं की रशियाने या भागातील निवासी भागामध्ये गोळीबार केला. त्यामध्ये नेमकं किती नुकसान झालं याची त्यांनी माहिती दिली नव्हती. आता या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येतंय.
रशियाकडून व्हॅक्युम बॉम्बचा वापर
रशियानं युक्रेनविरोधातील युद्धात प्रतिबंधित केलेल्या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा आरोप युक्रेननं केलाय. युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत ओकसाना मार्कारोव्हा यांनी हा दावा केलाय. व्हॅक्युम बॉम्ब सह इतरही प्रतिबंधित शस्त्रांचा वापर रशिया करत असल्याचा युक्रेनमधील मानवी हक्क संघटनांचा आणि युक्रेन सैन्याचा दावा आहे. युक्रेनकडून असा दावा होत असला तरी याबाबत संयुक्त राष्ट्रसंघ किंवा इतर कोणाकडूनही अद्याप अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : एकीकडे अणुयुद्धाची तयारी, दुसरीकडे युक्रेनशी चर्चा; अखेर पुतिन यांची योजना काय?
- Ukraine Russia War : तिसरं महायुद्ध झाल्यास कोणत्या देशाची कोणाला साथ? भारताची भूमिका काय?
- Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनमध्ये खतरनाक बॉम्बचा वापर, जाणून घ्या काय आहे व्हॅक्यूम बॉम्ब आणि क्लस्टर बॉम्ब?