Russia Ukraine War : 'G7 देश युक्रेनला युद्धासाठी शस्त्रे आणि पैसा पुरवतील', युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा
Russia Ukraine War : मॉस्को आणि कीवमधील वाढत्या तणावादरम्यान युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रविवारी G7 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली.
Russia Ukraine War : मॉस्को आणि कीव्हमधील वाढत्या तणावादरम्यान युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांची रविवारी G7 सदस्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत रशियाकडून सुरु करण्यात आलेल्या युद्धाला थांबवण्यासाठीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर दिमित्रो कुलेबा यांनी ट्विटमध्ये करत सांगितले आहे की, 'G7 सदस्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत G7 देश युक्रेनला स्वत:चा बचाव करण्यासाठी अधिक साधने उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. युक्रेनला संरक्षणात्मक शस्त्रे, लष्करी उपकरणे आणि आर्थिक मदत सुरूच आहे. युद्ध थांबवण्यासाठी रशियावर लादण्यात येणाऱ्या निर्बंधांवरही चर्चा करण्यात आली.'
कुलेबा यांनी रशियन तेल आणि गॅसवर संपूर्ण बंदी घालण्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, रशियन तेल आणि गॅस विकत घेणे म्हणजे युक्रेनियन नागरिकांच्या हत्येसाठी पैसे देणे'. कुलेबा यांनी ट्विट करत म्हटले, 'आम्ही रशियन तेल आणि गॅसवर संपूर्ण बंदी घालण्याचा आग्रह धरतो. आता ते विकत घेणे म्हणजे युक्रेनियन पुरुष, महिला आणि मुलांच्या हत्येसाठी पैसे देणे. या संदर्भात अनेक युरोपीय देशांनी उचललेल्या पहिल्या निर्णायक पावलांचे मी कौतुक आणि स्वागत करतो. तुम्ही आणि इतरांना धीर आणि मदत देण्यासाठी लवकर पाऊले उचलण्याचे आवाहन करतो.'
कुलेबा यांनी ट्विट केले की, "युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. आम्ही हार मानणार नाही. आम्ही थांबणार किंवा खचून जाणार नाही. जोपर्यंत आम्हाला आमच्या भूमीचे आणि आमच्या लोकांचे रक्षण करायचे आहे, तोपर्यंत आम्ही ठाम आणि कठोरपणे लढण्यासाठी वचनबद्ध आहोत.' दुसरीकडे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या न्यूक्लियर डेटरन्स फोर्सेसला हाय अलर्टवर ठेवण्याचे आदेश दिल्याचेही वृत्त समोर आलं आहे. यामुळे जगभरात चिंता वाढली आहे.
याबाबत अमेरिकेने यूएनमध्ये प्रश्नही उपस्थित केला आहे. युक्रेनवरील UNSC बैठकीत, यूएस प्रतिनिधी म्हणाले, 'रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवले आहे. रशिया अण्वस्त्र नसलेल्या देशावर हल्ला करत आहेत. त्यांनी नाटोकडूनही कोणताही धोका नाही.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युक्रेनमधून 2000 भारतीयांना सुखरुप बाहेर काढले, 249 लोकांसह पाचवे विमान दिल्लीला रवाना
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावर UNGA मध्ये 'आपत्कालीन विशेष सत्र', UNSC मध्ये भारत राहिला मतदानातून बाहेर
- Operation Ganga : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन गंगा’
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha