![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावर UNGA मध्ये 'आपत्कालीन विशेष सत्र', UNSC मध्ये भारत राहिला मतदानातून बाहेर
Russia Ukraine War : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) UNGA मध्ये युक्रेन-रशिया युद्धावर आपत्कालीन विशेष सत्र बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
![Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावर UNGA मध्ये 'आपत्कालीन विशेष सत्र', UNSC मध्ये भारत राहिला मतदानातून बाहेर russia ukraine war emergency UNGA special session to be held in united nations-2071021 UNSC Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावर UNGA मध्ये 'आपत्कालीन विशेष सत्र', UNSC मध्ये भारत राहिला मतदानातून बाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/8f6ed760286a3ba96e454f994780fbdf_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Russia Ukraine War : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) UNGA मध्ये युक्रेन-रशिया युद्धावर आपत्कालीन विशेष सत्र बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 15 सदस्य देशांपैकी 11 देशांनी बाजूने मतदान केले तर केवळ रशियाने विरोधात मतदान केले. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने मतदानात भाग घेतला नाही. अमेरिकेच्या वेळेनुसार, 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात महासभेच्या 11 व्या विशेष सत्र पार पडणार आहे. UNGA अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद सत्राचे अध्यक्ष असतील. याआधी 1950 पासून महासभेची केवळ 10 अधिवेशने बोलावण्यात आली आहेत.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, 'सीमेपलीकडील संघर्ष आणि अनिश्चित परिस्थितीमुळे आमच्या स्थलांतराच्या प्रयत्नांवर परिणाम झाला आहे. ही एक मानवतावादी गरज आहे ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही आजच्या मतदानातून स्वतःला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.'
युक्रेन-रशिया मुद्द्यावरील UNSC बैठकीत बोलताना तिरुमूर्ती म्हणाले, 'हिंसा थांबवण्याच्या आमच्या आवाहनाचा आम्ही पुनरुच्चार करतो. बेलारूस सीमेवर दोन्ही बाजूंनी भूमिका मांडण्याचा घोषणेचे आम्ही स्वागत करतो. आम्हाला युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची खूप काळजी आहे.'
दरम्यान, UNSC मधील रशियन फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणाले, 'रशियन सैन्य युक्रेनमधील नागरिकांसाठी धोका नाही, नागरी पायाभूत सुविधांवर गोळीबार करत नाहीत. नागरिकांसाठी धोका आता युक्रेनियन राष्ट्रवादींकडून निर्माण झाला आहे. नागरिकांना ओलिस ठेवत मानवी ढाल म्हणून वापर करण्यासाठी बंधक बनवले जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युक्रेनमधून 2000 भारतीयांना सुखरुप बाहेर काढले, 249 लोकांसह पाचवे विमान दिल्लीला रवाना
- Russia Ukraine War : युद्धाच्या चौथ्या दिवशीही युक्रेनवर हल्ला सुरूच, दोन मोठ्या शहरांना घेरल्याचा रशियाचा दावा
- North Korea : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी, दक्षिण कोरियाकडून पुष्टी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)